30.3 C
Maharashtra
August 1, 2021
Home » गूढ आणि वलयकारी ब्लॅक पँथर
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गूढ आणि वलयकारी ब्लॅक पँथर

प्रतिक मोरे

भारत आणि आफ्रिकेत मिळणारा काळा बिबट्या, साऊथ अमेरिकेतले काळे जग्वार यांचा समावेश होतो. यांचं लॅटिन भाषेतील कुळ panthera असल्यामुळे ही व्याख्या रूढ झाली असावी. परंतु प्रत्यक्षात मात्र ही वेगळी प्रजाती नसून काळया रंगाचे प्रमाण जास्त असणारा बिबट्या किंवा जग्वार हाच ब्लॅक पँथर नावाने ओळखला जातो

प्रतिक मोरे

“जंगल जंगल बात चली हैं पता चला हैं…. ” नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या मिलेनियल तरुणाच्या भाव विश्वात हे अजरामर गाणं. रविवारी लागणाऱ्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर मोगली लागलं की बाहेर खेळायला धावणारी पावलं टीव्ही समोर अडखळायची. यातली सगळीच पात्र शेर खान, मोहिनी, बल्लू, सगळे मोगलीचे जंगली भाऊबंद आज पण डोळ्यासमोर येतात. परंतु सगळ्यात जास्त ज्याच लहानपणापासून आकर्षण आहे तो म्हणजे बघिरा. बिबट्याचे सगळे स्वभाव गुण जणू कोळून प्यायलेला, शांत, सय्यमी आणि भेदक नजर जी काळजात आरपार जाईल, अत्यंत चपळ आणि तितकाच लॉयल. साहित्यात अत्यंत अजरामर झालेलं हे पात्र ब्लॅक पँथर नावाने जगभरात प्रसिद्ध आहे. मध्य भारतात घडलेल्या या कहाणी सारख्या अनेक आख्ययिका, गोष्टी पूर्ण आणि या प्राण्यांविषयी असलेले वलय मात्र जगभर पसरले आहे. 

कोल्हापुरातील संस्कृती, ताज्या घडामोडी आदी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा कोल्हापूर प्रतिबिंब फेसबुक पेजवर
https://www.facebook.com/groups/KolhapurCulture/

ब्लॅकपँथर या नावाचा विचार केला तर ती एक संयुक्तिक टर्म म्हणता येईल. यात भारत आणि आफ्रिकेत मिळणारा काळा बिबट्या, साऊथ अमेरिकेतले काळे जग्वार यांचा समावेश होतो. यांचं लॅटिन भाषेतील कुळ panthera असल्यामुळे ही व्याख्या रूढ झाली असावी. परंतु प्रत्यक्षात मात्र ही वेगळी प्रजाती नसून काळया रंगाचे प्रमाण जास्त असणारा बिबट्या किंवा जग्वार हाच ब्लॅक पँथर नावाने ओळखला जातो. भारतात फक्त बिबट्याच आढळत असल्याने आपल्याकडे काळया रंगाचा बिबट्या म्हणजेच ब्लॅक पँथर होय.

शरीराचे रंग ठरवणारे मेलानीन हे रंगद्रव्य वाढल्यामुळे म्हणजेच शास्त्रीय भाषेत मेलानिसम (melanism) यांचे शरीर काळया ठिपक्याऐवजी पूर्णतः काळे किंवा अधिक काळे दिसते. याउलट मेलानीन कमी झाल्यामुळे ल्युकिझम (Leucism) म्हणजेच पांढरा बिबट्या ही दिसू शकतो. जरी काळा रंग जास्त प्रमाणात असला तरी ठिपके बऱ्याच वेळेला दिसतात. ही एक जनुकीयस्थिती आहे. कोणत्याही प्रकारचा रोग नाही हे ही इथे लक्ष्यात घेतलं पाहिजे.

मेलानिझम हा एका रेसेसिवजीनमुळे होतो. एका मादीला काही पिल्ले मेलानिस्टिक तर काही नॉर्मल सुद्धा होऊ शकतात. बऱ्याच ठिकाणी असं दिसून आलेलं आहे की हे एका प्रकारच चांगलं उत्परीवर्तन आहे. दाट झाडी आणि जंगल असणाऱ्या प्रदेशात काळा रंग लपण्यासाठी फायदेशीर ठरत असल्यामुळे या भागात या रंगाचं प्रमाण जास्त दिसून आलेलं असल्याचा एक अभ्यास सांगतो.

संगमेश्वर तालुक्यातील आरवली आणि कोंडीवरे गावाच्या पंचक्रोशीमध्ये ब्लॅकपॅन्थरचे दर्शन वारंवार लोकांना होत आहे. या ठिकाणी वन विभागाने ट्रॅप कॅमेरे सुद्धा लावून याचे पुरावे गोळा करणे सुरू केले आहे.

प्राथमिक अभ्यासात हे नैसर्गिक प्रतिकार क्षमतेचे  फायदेशीर उत्परिवर्तन ( beneficial mutation) असल्याचे दिसून आले आहे. बिबट्याचे टिपिकल काळया रंगाचे ठिपके मेलानिझममुळे लपले जाऊन जे काळया रंगाचे नवीन पॅटर्न तयार होतात. त्यांना घोस्ट रोसेटी अशी म्हणतात. साधारणतः एकूण लोकसंख्येच्या ११  टक्के एवढं काळया बिबट्याचे प्रमाण हे त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत असू शकते. कॅमेरा ट्रॅप स्टडीमध्ये या बिबट्याचे प्रमाण हे सदाहरित आणि निमसदहरित वनांमध्ये जास्त प्रमाणात आढळले आहे.   कोकणात सुद्धा आतापर्यंत खूप वेळा काळया बिबट्याचा वावर दिसून आला आहे. काही वर्षांपूर्वी राजापूर आणि गुहागर अशा दोन ठिकाणी ब्लॅकपँथर विहिरीत पडल्याचे आढळून आले आणि यांना वन विभागाने यशस्वीरित्या जंगलात पुन्हा सोडून सुद्धा दिले होते. राजापूर गोठीवरेच्या परिसरात आजही अशा एका बिबट्याचा मुक्तवावर असल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शीनी पाहिले आहे. नुकताच संगमेश्वर तालुक्यातील आरवली आणि कोंडीवरे गावाच्या पंचक्रोशीमध्ये याच दर्शन वारंवार लोकांना होत आहे. या ठिकाणी वन विभागाने ट्रॅप कॅमेरे सुद्धा लावून याचे पुरावे गोळा करणे सुरू केले आहे. 

रुडयार्ड किपलिंगच्या जंगल बुक, अशाच नावाच्या मार्वल युनिव्हरस मधल्या एका हीरोचे नाव आणि बास्केटबॉल मधली सुप्रसिद्ध टीम कॅरोलिना पँथर्सचे मानचिन्ह असलेला हा ब्लॅकपँथर कवी कल्पनेतला नसून प्रत्यक्ष एक सुंदर आणि मनमोहक प्राणी आहे. हेच सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच.. 

Join and Like Our Page इये मराठीचिये नगरी for updates and Details…
https://www.facebook.com/IyeMarathichiyeNagari/

Related posts

निसर्ग !…

Atharv Prakashan

सह्याद्री कन्सर्वेशन रिझर्व संकल्पना

Atharv Prakashan

शेतकरी संघटना अन् मराठी साहित्याचे अनुबंध

Atharv Prakashan

गच्चीवर उतरत्या छप्पराची परवानगी अन् सक्ती गरजेची

Atharv Prakashan

अडेनियम डेझर्ट रोझची अशी करा लागवड ? (व्हिडिओ)

Atharv Prakashan

आता सोशल मिडीयावर वक्रनजर…

Atharv Prakashan

Leave a Comment