April 19, 2024
Chhatrapati Sambhaji Maharaj Literature Conference
Home » छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन येथे होणार १२ मार्चला
काय चाललयं अवतीभवती

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन येथे होणार १२ मार्चला

संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिक संभाजीराजे यांचे काम समाजासमोर यावे, यातून युवकांना प्रेरणा मिळावी असा उद्देश ठेवूनच संमेलनाचे आयोजन केले जाते.

दशरथ यादव

मुख्य संयोजक, छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन

सासवड : जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद आयोजित राज्यस्तरीय बारावे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन १२ मार्च २०२१ रोजी सासवड (ता. पुरंदर) येथे होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्यसंयोजक साहित्यिक दशरथ यादव यांनी सांगितली.

संमेलनाच्या संयोजन बैठकीला परिषदेचे राजाभाऊ जगताप, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्तानाना भोंगळे, श्यामकुमार मेमाणे, सुनील लोणकर, गंगाराम जाधव, नंदकुमार दिवसे, दत्ता कड, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक सुनील धिवार, विजय तुपे, संतोष जवळकर, अमोल भोसले, संजय सोनवणे, सुरेश वाळेकर आदी उपस्थित होते.

क-हा काठावर दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात ग्रंथदिडी, उदघाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन व समारोप असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात महत्वपूर्ण भुमिका बजावलेल्या या परिसरात पुरंदर किल्ल्यावर संभाजीराजांचा जन्म झाला. सात गड आणि नऊ घाटांचा ही शंभर चौरस मैलाची क-हेपठारची दौलत आजही दिमाखात उभी आहे. संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिक संभाजीराजे यांचे काम समाजासमोर यावे, यातून युवकांना प्रेरणा मिळावी असा उद्देश ठेवूनच संमेलनाचे आयोजन केले जाते.

संमेलनात सहभागी होणा-या कवी, लेखकांनी ९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन राजाभाऊ जगताप यांनी केले .

Related posts

आर्थिक धोरणांमध्ये सुधारणा करण्याची गरज

कष्टमय जीवनातून मिळणारे यशही तितकेच मोठे

साठी पार योगा…

Leave a Comment