March 29, 2024
China now considered the number one enemy of the US Russia and India
Home » चीन आता अमेरिका, रशिया अन् भारताला नंबर एकचा शत्रू का वाटतो ?
सत्ता संघर्ष

चीन आता अमेरिका, रशिया अन् भारताला नंबर एकचा शत्रू का वाटतो ?

चीन दिवसेदिवस साऱ्या जगाचा धोका बनत आहे, ही सार्वत्रिक ओरड सुरू झाली पण चीन त्याला काहीही किंमत द्यायला तयार नाही.
डॉ. सुभाष देसाई

मोबाईल – 9423039929

सतरा जून रोजी जिनेव्हामध्ये दोन बड्या राष्ट्रांच्या नेत्यांची बैठक झाली. रशियाचे सर्वेसर्वा ब्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन या दोघांची ही बैठक होती. याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. भारताच्या दृष्टीतून या दोघांच्या बैठकीला आणि त्यातील निर्णयांना खूपच महत्त्व आहे. अर्थात ब्लादिमीर पुतीन आणि बायडेन यांची ही काही पहिली बैठक नव्हे, यापूर्वी बराक ओबामांच्या बरोबर बायडेन गेले असता पुतीन यांची भेट झाली होती.

आतापर्यंत ब्लादिमीर पुतीनने अमेरिकेच्या चार राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर चर्चा केलेल्या आहेत. त्यामुळे या बैठकीबाबत ते अत्यंत आत्मविश्वासपूर्वक आणि स्थिरतेने सामोरे गेले. या बैठकीपूर्वी काही महत्त्वाच्या प्रसारमाध्यमांनी पुत्तीनना विचारले की” रशिया इराणला सॅटॅलाइट टेक्नोलॉजी देत आहे त्यामुळे अमेरिका आणि इस्राईलच्या लष्करी तळावर हल्ले करायला इराणला सोपे जाईल”
यावर पुतीन यांनी हे स्पष्ट केले की” हे मलाच नवीन आहे. ही चुकीची बातमी आहे. आमचा असा कोणताही उद्देश नाही शिवाय अशा उच्च तंत्रज्ञानासाठी इराणची तयारीही नाही. अमेरिका मिडिया आमच्याबाबत पूर्वग्रहदूषित होऊन अशा बातम्या का पसरवतो हेही मला कळत नाही.”

जी ७ बैठकीबाबत पुतीन म्हणाले” मीही त्या बैठकीला काहीवेळा गेलो होतो. लोकांनी भेटावे, चर्चा करावी मतभेदही व्यक्त करावेत ही चांगली गोष्ट आहे आणि नाटोबद्दल ते म्हणाले शीतयुद्धाच्या दरम्यान ते स्थापन झाले पण आता त्याची गरज नाही”

बायडेननी मवाळ भूमिका घेतली आणि पुतिन यांच्या बैठकीबाबत सांगितले की “यात वैरभाव नव्हता आणि बैठक अतिशय सकारात्मक आणि कन्स्ट्रक्टिव्ह झाली.” अर्थात हे दोन्ही नेते एकमेकाच्या डोळ्याला डोळा भिडवत नव्हते. पुतीनना अमेरिकेकडून अत्यंत व्यवहारी पातळीवरची मैत्री हवी आहे मात्र अमेरिकेच्या दुटप्पी धोरणावर आणि मानवी हक्क संदर्भातील भूमिकेबद्दल रशिया साशंक आहे एक मात्र खरे की अमेरिकेचा नंबर एकचा शत्रू आता रशिया उरलेला नाही तर ती जागा आता चीनने घेतली आहे. पुतिन आणि बायडेन यांचा कळीचा मुद्दा होता सायबर सेर्क्युरिटी.

याबाबतचे त्यांचे मतभेद कायमच राहिले. जोसेफ बायडन यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की” दोन राष्ट्रांचे नाते स्थिर राहावे पारदर्शक बनावे म्हणून आम्ही भेटलो. कोरोनाच्या काळात अमेरिकन लोकांचे हित सांभाळण्यासाठी आणि सर्व मानव जातीची लोकशाही मूल्ये जतन करण्यासाठी सुसंवाद वाढला पाहिजे या मताचा मी आहे. रशियाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व द्यावे असेही अमेरिकन अध्यक्षांनी सांगितले. युद्ध अस्त्रांच्याबाबत चर्चा झाली. रशियाने अमेरिकेवर 16 सायबर हल्ले केल्याचे तपशील यांनी मांडले आणि रशियाने या गुन्हेगारावर गुन्हे दाखल करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. सीरियामध्ये लोकांची उपासमार होत आहे तेथे आण्विक अस्त्रांचा वापर कोणीही करू नये अशी चर्चा झाली. अफगाण प्रश्नावर चर्चा झाली अर्थात बैठकीमध्ये कोणताही तणाव नव्हता अण्वस्त्र हा जगाला धोका नको असे मला वाटते त्याबाबत रशिया आणि अमेरिका दोघांनीही जबाबदारीने वागले पाहिजे असे पुटीन यांनी मत व्यक्त केले.

डोनाल्ड ट्रम्प आणि बायडन या दोघाही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दृष्टिकोनातून चीनची वाढती ताकद ही धोकादायक बनत आहे. चीनच्या परराष्ट्र खात्याचे म्हणणे आहे ही कॉल्ड वाॅर मेंटॅलिटी आहे रशिया आणि अमेरिका इतर देशांना अकारण आमच्या विरोधात उभा करीत आहेत. नाटोचा गैरवापर होत आहे.

रशिया अमेरिकेप्रमाणे भारत आता चीनला नंबर एकचा शत्रू मानतो, मात्र फ्रान्स तसे मानत नाही. म्हणून चीनचे मत आहे की युरोप या अमेरिका-रशियाच्या भारताच्या दृष्टिकोनाशी कधीच सहमत होणार नाही. चीन दिवसेदिवस साऱ्या जगाचा धोका बनत आहे, ही सार्वत्रिक ओरड सुरू झाली पण चीन त्याला काहीही किंमत द्यायला तयार नाही. भारताबाबत म्हणाल तर संरक्षणाबाबत भारत अमेरिका आणि रशियावर व इस्राईलच्या तंत्रज्ञानावर अवलंबून आहे हे चीनला पूर्ण माहित आहे.

Related posts

स्त्री शक्तीची कथा…मनस्विनी

विसाव्या शतकातील मराठासमाज : मौल्यवान अन्वयार्थक दस्तऐवज

मराठी भाषा अभिजातच !

Leave a Comment