April 20, 2024
Language Development Through Twitter research article
Home » ट्विटरच्या माध्यमातून भाषांचा विकास
संशोधन आणि तंत्रज्ञान

ट्विटरच्या माध्यमातून भाषांचा विकास

2006 मध्ये ट्विटरची सुरुवात झाली. त्यावेळी ट्विटरवर शिका, शिकवा, शिक्षण, शिक्षित करा, शैक्षणिक या शोध संज्ञा वापरल्या जात होत्या. बऱ्याच अभ्यासकांच्या मते ट्विटर हे विशेषतः औपचारिक शिक्षणाच्या संदर्भात प्रभावी शिक्षण देणारे माध्यम आहे. आता त्याचा वाढलेला वापर भाषांच्या विकासात निश्चितच उपयुक्त ठरणारा आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

तंत्रज्ञानामुळे भारतीय स्थानिक भाषा मागे पडतील की काय अशी भिती व्यक्त केली जात होती. पण गेल्या काही वर्षात नवतंत्रज्ञानात भारतीय भाषेचा होत असलेला वापर विचारात घेता आणि भारतीय काही स्थानिक भाषांनी यात घेतलेली आघाडी पाहाता. नव्या तंत्रज्ञानातही भारतीय भाषा टिकूण तर राहणारच पण जागतीक पातळीवर त्यांचा विस्तार होणार हे आता स्पष्ट जाणवत आहे. ट्विटरमध्येही आज भारतीय सात भाषांचा समावेश आहे. या भाषामध्ये इतर भाषेत केलेले ट्विट भाषांतरीत करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. त्यामुळे या भाषांच्या विकासाबरोबरच विस्तारालाही मोठा वाव निर्माण झाला आहे. हिंदी, गुजराती, मराठी, उर्दु, तामिळ, बंगाली आणि कन्नड या भाषेत आज ट्विटर उपलब्ध आहे. यातून असेही म्हणता येईल की नवे तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर विकसित करायचे झाल्यास ते तंत्र विविध भाषांत उपलब्ध करून दिल्यास त्या तंत्राचा विकास झपाट्याने होतो. त्यामुळेच आज जगात ट्विटर वापरात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. जानेवारी 2021 च्या आकडेवारीनुसार अमेरिकेत 69.3 दशलक्ष ट्विटरचे वापरकर्ते आहेत. जपानमध्ये 50.9 तर भारतात 17.5 दशलक्ष ट्विटरचे वापरकर्ते आहेत.

2006 मध्ये ट्विटरची सुरुवात झाली. त्यावेळी ट्विटरवर शिका, शिकवा, शिक्षण, शिक्षित करा, शैक्षणिक या शोध संज्ञा वापरल्या जात होत्या. बऱ्याच अभ्यासकांच्या मते ट्विटर हे विशेषतः औपचारिक शिक्षणाच्या संदर्भात प्रभावी शिक्षण देणारे माध्यम आहे. आता त्याचा वाढलेला वापर भाषांच्या विकासात निश्चितच उपयुक्त ठरणारा आहे.

ट्विटरची व्याख्या –

२००६ मध्ये जॅक डॉर्सी यांनी ट्विटर विकसित केले. तेव्हा ट्विटर हे उथळ आणि अगदी भाषेचा क्षोम करणारे आहे, असे जुन्या पिढीतील व्यक्तींना वाटले. काहींनी ट्विटरची व्याख्या विसंगत माहितीचा एक छोटासा स्फोट अशी केली.

ट्विटरवर वापरल्या जाणाऱ्या टॉप १० भाषा –

२००६ मध्ये ट्विटरवर ९८ टक्के वापर हा इंग्रजी भाषेचाच होता. त्यानंतर सात वर्षांनतर 2014 मध्ये अन्य भाषांचा वापर वाढला तसा इंग्रजीचा वापर घटला. तो केवळ ५१ टक्केच होऊ लागला. जापनिज ( 14.8 टक्के), स्पॅनिश (13.4 टक्के), पोर्तुगिज ( 5.1 टक्के ), इंडोनेशियन ( 3.2 टक्के ) अरेबिक (3.2 टक्के ) फ्रेंच (2.4 टक्के ) तुर्कीश (1.8 टक्के ) रशियन ( 1.3 टक्के) आणि कोरियन (1.1 टक्के) इतका होता. ट्विटरवर 2014 मध्ये 40 भाषांचा वापर होत होता.

सर्वाधिक ट्विट इंग्रजीत केले जातात. त्या खालोखाल जापनिज, पोर्तुगिज, इंडोनेशियन, स्पॅनिश, डच, कोरियन, फ्रेंच, जर्मन आणि मालये या भाषात ट्विट केले जाते. ट्विटरमध्ये भारत वापरकर्त्यांत तिसऱ्या क्रमांकावर जरी असला तरी ट्विटरच्या टॉप १० मध्ये एकही भारतीय भाषा नाही. यासाठी भारतीय भाषामध्ये ट्विट्सची संख्या वाढणे गरजेचे आहे. भारतीय भाषांचा ट्विटरवर वापर वाढल्यास साहजिकच भारतीय भाषांचे महत्त्व वाढेल. या भाषांचा विस्तार होणे सहज शक्य होईल. यासाठी आकर्षक शब्द संवाद आणि प्रोत्साहित करणारे ट्विट वाढल्यास भारतीय भाषा जागतिक पातळीवर आपले स्थान निर्माण करू शकतील.

ट्विटरचा भाषेच्या वापरावर परिणाम –

ट्विटरवर सुरवातीच्या काळात अक्षरांची मर्यादा १४० इतकीच होती. त्यामध्ये नंतर त्यांनी वाढ करत २८० केली. इतक्या कमी शब्द मर्यादेत संदेश वहन करण्यात येत असल्याने भाषेची मोडतोड होणे हे स्वाभाविक होते. यामध्ये व्याकरणाचे नियम पाळले जात नाहीत आणि लघुरुपांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने सुरवातीच्या काळात ट्विटरला इंग्रजी भाषेचा शत्रू मानले जात होते. ट्विटरमुळे भाषेची मोडतोड होईल की काय अशी भितीही व्यक्त केली जात होती.

२०१७ मध्ये ट्विटरने शब्द मर्यादा वाढवून २८० अक्षरे इतकी केली. याचा भाषेच्या वापरात मोठा फरक पडल्याचे दिसून आले. सुरुवातीस शब्दांची लघुरुपे वापरली जात होती. त्याचे प्रमाण घटले. १४० शब्दांचे ट्विट करण्याचे प्रमाण आता एक टक्के इतके राहीले आहे. इंग्रजीत ur, u8, b4, gr8, sry अशी लघुरुपे ट्विटमध्ये वापरली जात होती. शब्दमर्यादा २८० केल्यानंतर अशा लघुरुपांच्या वापराचे प्रमाण कमी झाले. Gr8 चे प्रमाण ३६ ट्क्क्यांनी, b4 चे प्रमाण १३ टक्क्यांनी, sry चे प्रमाण ५ टक्क्यांनी घटले. तर शब्द मर्यादा वाढवल्यानंतर great (३२ टक्के), before (७० टक्के), sorry (३१ टक्के), please ( ५४ ट्कके ), Thank you (२२ टक्के) लघुरुपात न वापरता पूर्ण शब्दात वापरण्याचे प्रमाण वाढले.

ट्विटरचा वापर भाषा शिकण्यासाठी –

अनेक भागात ट्विटरचा वापर हा भाषा शिकण्यासाठी केला जात आहे. चीनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार ९४ टक्के विद्यार्थ्यांचे इंग्रजी ट्विटरमुळे सुधारले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये ट्विट करण्यास सांगितले जात असे. सर्व विद्यार्थ्यी इंग्रजीमध्ये ट्विटरच्या माध्यमातून संपर्क करत असत. या वापरातून या विद्यार्थ्यांची इंग्रजी सुधारल्याचे निदर्शनास आले. चीनमध्ये सुद्धा  चिनी भाषा शिकण्यासाठी ट्विटरचा उपयोग करण्यात आला. यातून विद्यार्थ्यांची भाषा सुधारल्याचे निदर्शनास आले.

ट्विटरमुळे भाषेचा विकास

ट्विटरमुळे भाषेचा विकास होत आहे. कारण व्यक्त होण्यासाठी एक व्यासपिठ लोकांना उपलब्ध झाले आहे. बरेचजण फारच कमी बोलतात, त्यांच्यासाठी ट्विटर हे एक उत्तम साधन ठरले आहे. अगदी कमीत कमी शब्दात प्रभावीपणे आपण मांडलेले विचार अनेकांना भावतात. त्यातून संवाद वाढतो. अशातून साहजिकच भाषेचा विकास होत आहे. अगदी सर्व सामान्य व्यक्तीही यामुळे व्यक्त होऊ लागली आहे. भाषेच्या विकासासाठी या व्यासपिठाचा योग्य प्रयत्न करणे हे आता गरजेचे आहे. 

ट्विटरवर मराठीचा वापर वाढण्यासाठी… –

  1. मराठीचा वापर वाढण्यासाठी मराठी हॅशटॅग वापरून ट्विट करण्यासाठी वापरकर्त्यांना आवाहन करणे
  2. ट्विटरवर मराठी भाषेच्या विकासासाठी विविध साहित्य संमेलने भरवणे.
  3. मराठी साहित्य ट्विटरवर वाचले जावे. संवाद वाढावा यासाठी #माझीकविता #ट्विटकथा #माझाब्लॉग #माझीबोली #साहित्यसंमेलन #वाचनीय #हायटेकमराठी #बोलतोमराठी #मराठीशाळा #भटकंती #खमंग #माझेवेड असे हॅशटॅग वापरून भाषेचा वापर वाढवण्यासाठी वापरकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे.
  4. विविध मराठी परिषदांचे आयोजन ट्विटरवर करणे.
  5. मराठी भाषेचा प्रसार प्रचार व्हावा, यासाठी मराठी शिका हा उपक्रम ट्विटरद्वारे राबविणे शक्य आहे. यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. जगभरात कोठेही बसून मराठी शिकता येणे शक्य करता येईल.
  6. ट्विटरवर संदेश हा मोजक्याच शब्दात मांडला जात असल्याने तो आकर्षक व अतिप्रभावी करण्यासाठी तसे प्रयत्न केल्यास नव्या तंत्राने भाषेचा विकास शक्य आहे.

ट्विटरची देशी आवृत्ती कु –

ट्विटरची देशी आवृत्ती कु चा वापर सध्या भारतात वाढला आहे. यावर ४०० अक्षरांची मर्यादा असल्याने ट्विटरपेक्षा हे अधिक उपयुक्त ठरत आहे. मराठीचे वापरकर्त्येही यामध्ये अधिक आहेत. पण हे वेब भारतीय असल्याने केवळ भारतातच याचा वापर होतो आहे. भारतीय व्यक्तींना व्यक्त होण्यासाठी मात्र हे एक उत्तम व्यासपिठ उपलब्ध झाले आहे. अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिडवाटक हे कुचे संस्थापक आहेत. कु १४ नोव्हेबर २०१९ ला उपलब्ध झाले अन् आता जवळपास १० लाखापेक्षा अधिक याचे वापरकर्त्ये आहेत. सुमारे २.६ दशलक्ष व्यक्तींनी हे ऍप मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे. प्रथम हे कन्नड भाषेत आले. त्यानंतर ते हिंदी, इंग्रजी, तमिळी, तेलगु आणि मराठी या भाषात आले आहे. आता ते आसामी, बंगाली, गुजराती, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मैथिली, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत आणि उर्दु यामध्येही येत आहे. यामुळे भारतीय भाषांत अनेक व्यक्ती व्यक्त होत आहेत. यातून निश्चितच भारतातील विविध भाषा विकसित होण्यास मोठा हातभार लागणार आहे.

ट्विटरप्रमाणे हे जागतिक स्तरावर विकसित होण्यास बऱ्याच अडचणी येणार आहेत. कारण अन्य परकिय भाषा यावर उपलब्ध नाहीत. यासाठी ट्विटरवर मराठी भाषिकांनी जोर दिल्यास ‘कु’ प्रमाणे यावर मराठीत अधिक ट्विट केल्यास मराठीचा बोलबाला जगभर होऊ शकेल. मराठी भाषेतून मराठी संस्कृती, विचार, मराठी बाणा जगभर पाहीला जाईल व साहजिकच ही भाषा शिकण्याची परकियांची ओढ लागेल. मराठीतील वाचनिय साहित्य, विचार यातूनच आपण मराठीचा विस्तार जगभर करू शकतो. यासाठी ट्विटरच्या माध्यमातून तसे प्रयत्न होणे गरजेचे आहे.

भारतीय भाषा ट्विटरवर येणे हे भाषेचे महत्त्व वाढवणारे आहे. पण भाषांच्या विकासासाठी तितकाच प्रयत्न होणे गरजेचे आहे. या भाषांमध्ये ट्विट्स वाढल्यास या भाषांचे महत्त्व जागतिक पातळीवर निश्चितच वाढेल. या भाषा जागतिक पातळीवर विकसित होण्यास मदत होऊ शकेल. ट्विटरचे भारतीय वापरकर्त्ये साहजिकच अधिक असल्याने हे शक्य होणारे आहे. चायनिय आणि इंग्रजी भाषा शिकण्यासाठी ट्विटरचा वापर केला गेला. तसा वापर भारतीय भाषा शिकण्यासाठी झाल्यास या भाषांचा विकास आणि विस्तार जगभरात होऊ शकेल. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

संदर्भ

  • इंटरनॅशनल जर्नल ऑफ एज्युकेशनल टेकनॉलॉजी इन हायर एज्युकेशन,
  • https://www.theatlantic.com/ REBECCA GREENFIELD OCTOBER 31, 2011
  •  Impact on Lengh of tweet, Sarah Perez, techcrunch.com Octomber 30, 2018
  • Twitter as a formal and informal language learning tool: from potential to evidence – Fernando Rosell-Aguilar1
  • What the Tweets say: A critical analysis of Twitter research in language learning from 2009 to 2016.
  • David Hattem, United Nations, USA And Lara Lomicka, The University of South Carolina, USA
  • ‘LET’S TWEET TO LEARN ENGLISH’: USING TWITTER AS A LANGUAGE TOOL IN THE ESL/EFL CLASSROOM PRAMOD KUMAR SAH University of Central Lancashire, UK  LangLit An International Peer-Reviewed Open Access Journal
  • The Language of Twitter Dr. Bethan Davies, UNIVERSITY OF LEEDS UNDERGRADUATE DISSERTATION, DEPARTMENT OF LINGUISTICS AND PHONETICS.

Related posts

अध्यात्माची पहिली पायरी

मनाची स्थिरतेसाठी आवश्यक शास्त्र अभ्यासायला हवे 

गुरूंची आवश्यकता कशासाठी ?

Leave a Comment