Home » मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या पुरस्कार योजनेसाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या पुरस्कार योजनेसाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

मुंबई : ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्यावतीने विविध साहित्य प्रकारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी साहित्य पुरस्कारांच्या दोन योजना जाहीर केल्या आहेत.

मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे या शतकोत्तर रौप्य महोत्सवी संस्थेच्या वतीने सन २०१७ – १८ पासून ‘राज्यस्तरीय श्रीस्थानक साहित्य पुरस्कार’ सुरू केले आहे. हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येणार आहेत. यामध्ये चरित्र, आत्मचरित्र, कादंबरी, कथा, कविता, विनोद, अनुवाद, प्रवास, बाल साहित्य, इतिहास, विज्ञान, पर्यावरण या प्रकारातील साहित्याचा समावेश आहे.

हे साहित्य एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर २०२० या कालावधीत प्रकाशित झालेले असावे. संबंधित साहित्याच्या प्रत्येकी दोन प्रती पाठवणे आवश्यक असून लेखक वा प्रकाशक या प्रती पाठवू शकतात. या पुरस्कारांचे स्वरूप रोख पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे असून २८ फेब्रुवारीपर्यंत पुस्तके मराठी ग्रंथ संग्रहालय, सरस्वती मंदिर, सुभाष पथ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे 400601 या पत्त्यावर पाठविण्यात यावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts

तरुणाईच्या भावनेतून साकारलेला कोरोना काळातील दस्तऐवज

Atharv Prakashan

जीवनावर मार्मिक भाष्य करणाऱ्या कविता – आईचा हात

Atharv Prakashan

महाराष्ट्रातील बदललेली शेती…

Atharv Prakashan

Leave a Comment