Pithakshar Mahadev More Interview by Ramesh Salunkhe
Home » महादेव मोरेंना सलाम…पीठाक्षरं (भाग – २)
मुक्त संवाद

महादेव मोरेंना सलाम…पीठाक्षरं (भाग – २)

पिठाची गिरणी चालवणाऱ्या या निर्मळ मनाच्या साहित्यिकापर आता साहित्याचे तरुण अभ्यासक प्रा. डॉ. रमेश साळुखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘डॉक्युमेंटरी’ची निर्मिती केली आहे. डॉ.साळुखे हे एखाद्या लेखकाच्या लेखनाचा आपल्या लेखनातून शोध घेताना त्याच्या मुळांचा शोध घेतात. त्यामुळेच त्यांना महादेव मोरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा डॉक्युमेंटरी’ची निर्मिती करून शोध घेणे क्रमप्राप्त वाटले असणार.

अजय कांडर

‘तुमच्या जगण्याची नैतिकता तुमच्या लेखनात दिसायला हवी असेल तर तुमचे आणि तुमच्या भोवतालाचेच जगणे आपल्या लेखनात मांडायला हवे !’ कविवर्य नारायण सुर्वे यांच्या या उद्गाराची आठवण नेहमी होते ती ज्येष्ठ लेखक महादेव मोरे यांचे लेखन वाचताना. सुमारे ९४-९५ चा काळ असेल. निपाणीला तेथील तरुण साहित्यिकांनी एका वाङ्मयीन चळवळीची स्थापना केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आले. उद्घाटकांचा बराचवेळ झाला तरी पत्ताच नव्हता. शेवटी ते आले.
उद्घाटन झाल्यानंतर ते म्हणाले, ‘माझे पोट पिठाच्या गिरणीवर आहे. दळणं खूप होती. ते सारे आवरून येईपर्यंत मला यायला उशीर झाला’ अर्थात हे उद्गार होते महादेव मोरे यांचेच.

पीठाक्षरं …महादेव मोरे यांची मुलाखत व मान्यवरांच्या प्रतिक्रिया

पिठाची गिरणी चालवणाऱ्या या निर्मळ मनाच्या साहित्यिकापर आता साहित्याचे तरुण अभ्यासक प्रा. डॉ. रमेश साळुखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘डॉक्युमेंटरी’ची निर्मिती केली आहे, याचा निश्चितच महादेव मोरे यांच्या चाहत्यांना आनंद झाला असणार. डॉ.साळुखे हे एखाद्या लेखकाच्या लेखनाचा आपल्या लेखनातून शोध घेताना त्याच्या मुळांचा शोध घेतात. त्यामुळेच त्यांना महादेव मोरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा डॉक्युमेंटरी’ची निर्मिती करून शोध घेणे क्रमप्राप्त वाटले असणार.

अर्थात ही अभिनंदनीयच घटना आहे. कारण महादेव मोरे यांच्या लेखनातून जे जग वाचकांसमोर आले आहे, ते ‘विव्हळत्या’ जगाचे रूप आहे. आयुष्यभर अज्ञानात आणि दारिद्रात पिचणाऱ्या लोकसमूहाची त्यांनी आपल्या लेखनातन वेदना मांडली. कल्पनेतून साहित्याची निर्मिती करणे आणि वास्तवाला कवेत घेऊन त्यातील दुखरी नस पकडणे या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळेच कलावादाला झुगारून जीवनवादी साहित्याची निर्मिती साठ-सत्तरच्या दशकापासून होऊ लागली. पण वास्तववादी लेखन करताना तुमच्या जाणिवा किती प्रगल्भ आहेत. त्यांचा तुमच्या नेणिवेवर काय परिणाम होतो. यातूनच वास्तवतेची तीव्रता तुमच्या लेखनात उमटत असते.

पीठाक्षरं – भाग १

श्री. मोरे याबाबतीत मात्र उजवे ठरतात. याचे कारण त्यांनी आपल्या लेखनात आणलेले जग. त्यांचे सर्वच वाङ्मयीन लेखन वेगळ्याच जगाचे, परिणामी वेगळ्याच जाणिवांचे दर्शन घडविते. यात तळातला वर्ग येतो. हेच त्यांच्या लेखनाचे वेगळेपण आहे.

२००७ साली मोरे यांना महाराष्ट्र फाऊंडशन सारख्या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना श्री. मोरे म्हणाले होते, ‘मी इथे खूप बावरलो आहे, मला अशा मोठ्या लोकांसमोर यायची सवय नाही. मला यापेक्षा माझे लेखनच जवळचे वाटते. या त्यांच्या वक्तव्यातून त्यांच्या जगण्याची आणि लेखनाचीही निर्मळता स्पष्ट होते. डॉ. साळुखे यांनी मोरे यांच्यावर ‘डॉक्युमेंटरी’ची निर्मिती करून त्यांच्या या निर्मळतेलाच सलाम केला आहे !

आज मराठी साहित्यामध्ये सीमावर्ती जीवन समजून घ्यायचे असेल तर महादेव मारे यांचे साहित्य अभ्यासायला हवे. त्यांच्या साहित्यात सीमावर्ती जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. याची उत्तम मांडणी त्यांनी केली आहे. सीमावर्ती जीवनाचे चिंतन मोरे यांच्यासाऱखे अन्य कोणी केल्याचे माझ्या पाहण्यात नाही. 
- कै. भैरव कुंभार

Related posts

किती खरे किती खोटे…

Atharv Prakashan

बागुलबुवा…

Atharv Prakashan

‘स्त्रीपुरुषतुलना’ – ताराबाई शिंदे

Atharv Prakashan

Leave a Comment