April 19, 2024
Soap Bubbles for Pollination New Research
Home » साबणाच्या फुग्यांचा परागीभवनासाठी वापर
संशोधन आणि तंत्रज्ञान

साबणाच्या फुग्यांचा परागीभवनासाठी वापर

नैसर्गिक परागीभवनाचे कमी होत असलेले प्रमाण विचारात घेता आता कृत्रिम परागीभवनावर भर देणे गरजेचे ठरत आहे. यावर आय-सायन्समध्ये एक शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. यामध्ये झी. यांगू आणि इंजिरो मायाको या संशोधकांनी परागीभवनासाठी साबणाच्या फुग्यांचा वापर केला. त्यात त्यांनी उत्तम परिणाम मिळाल्याचा दावा केला आहे.

राजेंद्र घोरपडे

परागीभवन हे पिकांच्या उत्पादन वाढीसाठी गरजेचे असते. त्याचा उत्पादन वाढीवर थेट परिणाम होतो. नैसर्गिक परागीभवन हे मुख्यतः मधमाश्‍या व किटकांमार्फत होते; पण बदलत्या हवामानामुळे व वाढत्या किटकनाशकांच्या वापराने मधमाश्‍या व किटकांचे प्रमाण घटत आहे. हा जागतिक स्तरावर भेडसावणारा प्रश्‍न आहे. परागीभवनासाठी अन्य पर्याय शोधणे हे संशोधकांपुढे आव्हान उभे राहिले आहे. नैसर्गिक परागीभवनाचे कमी होत असलेले प्रमाण विचारात घेता आता कृत्रिम परागीभवनावर भर देणे गरजेचे ठरत आहे. यावर आय-सायन्समध्ये एक शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. यामध्ये झी. यांगू आणि इंजिरो मायाको या संशोधकांनी परागीभवनासाठी साबणाच्या फुग्यांचा वापर केला. त्यात त्यांनी उत्तम परिणाम मिळाल्याचा दावा केला आहे.

प्राचीन काळापासून कापडाचे पोतेरे किंवा हाताने ब्रश करून परागीभवन घडविण्याची पद्धत रूढ होती; पण यासाठी कामगार मोठ्या प्रमाणात लागतात. त्यानंतर मधमाश्‍या पालनाचा पर्याय पुढे आला. आवश्‍यक पिकाच्या क्षेत्रात मधमाश्‍या पालन करून परागीकरण घडवल्याने पिकांच्या उत्पादनावर परिणाम झालेला पाहायला मिळाला. विशेषतः सूर्यफुलाच्या पिकात याचा वापर केला गेला. हाताने ब्रश करण्यात लागणारी मजुरांची संख्या कमी करण्यासाठीही विविध प्रयोग करण्यात आले. यात परागकण फेकणारे डस्टर, फवारणी यंत्रांचा वापर केला जाऊ लागला आहे; पण यासाठीही मोठ्या प्रमाणावर खर्च लागतो. यावर पर्याय शोधले जात आहेत. आता रोबोटिक परागीभवनाचाही शोध लावण्यात आला आहे. असे विविध शोध लावण्यात येत आहेत. झी. यांगू आणि इंजिरो मायाको व काही संशोधकांनी साबणाच्या फेसापासून तयार करण्यात आलेले फुगे वापरून परागीकरण करण्याची पद्धत विकसित केली आहे.

साबणाचे फुगे परागीकरणासाठी वापराचे फायदे –

  • फुग्यामुळे परागांचे वहन सहजरित्या होते.
  • निश्‍चित केलेल्या फुलावर परागकण टाकणे सोपे जाते.
  • फुग्याच्या पृष्ठभागावरील चिकटपणामुळे परागकण वाया जाण्याचे प्रमाण कमी होते.
  • परागीभवनाची क्रिया वाढवण्यास मदत होते.
  • मानवरहित हवाई वाहनातून (यूएव्ही) स्वयंचलितपणे लिलियम जॅपोनिकम फुलांपर्यंत परागकणांचे वहन करणे संशोधकांना सहज शक्‍य झाले.

साबणाचे फुगे तयार करणारे द्रावण –

संशोधकांनी पाच विविध द्रावणांचा परिणाम तपासला. ती द्रावणे अशी – लॉरॅमिडोप्रॉपिल बीटेन (एएमफिटोल 20 एबी)
[ए -20 एबी]), सोडियम पॉलिऑक्‍सिथिलीन लॉरिल इथर सल्फेट (ईएमएल ई -27 सी [ई -27 सी]), लॉरीहाइडॉक्‍सिसेल्फो बेटेन(एएमफिटोल 20 एचडी [ए -20 एचडी]), सोडियम पॉलिऑक्‍सिथिलीन अल्काईल इथर सल्फेट (ईएमएल डी 3 डी [ई-डी 3 डी]) आणि [एन-कोकोयल- (2-अमिनोइथिल) -एन- (2-हायड्रॉक्‍साइथिल) -एन-सोडियम कार्बोक्‍साइमिथिल] इथिलिनडिआमाइन (एएमफिटोल 20 वायबी).

Related posts

कोरोना काळातही कृषी क्षेत्रात उत्साहजनक वृद्धी

यंदा तांदुळ अन् उसाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज

देशा बाहेर जाणारा पैसा रोखण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन

Leave a Comment