March 28, 2024
Home » अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

कोल्हापूर :  गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचाच्यावतीने अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके मागविणेत येत आहेत.  लेखक, प्रकाशक यांनी 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व अल्पपरिचय 20 जानेवारी 2021 पर्यंत पोचतील, अशारितीने पाठवावीत. कथा, कादंबरी, कविता, आत्मकथन आणि बालसाहित्य (गद्य, पद्य दोन्ही ) या साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जातील. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गौरवपत्र असे असेल.  पहिल्या अक्षरसागर साहित्य संमेलनाध्यक्षांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. 

संपर्क – राजन कोनवडेकर (अध्यक्ष)  9822226458,  प्रा. डाॅ. अर्जुन कुंभार (उपाध्यक्ष) 9890156911, डाॅ. मा. ग. गुरव (सदस्य)  9421114262   

पुस्तके पाठवणेचा पत्ता –  बा. स. जठार, सचिव,  अक्षरसागर साहित्य मंच, विद्यासागर निवास, शिंदेवाडी रोड, गारगोटी. ता. भुदरगड, जि. कोल्हापूर – 416209. मो. 9850393996,  9403466256  

Related posts

मराठी भाषागौरव दिन आणि राजभाषा दिवस यातील फरक 

“वुई….द रीडर्स’…आगळावेगळा व्हाॅट्सअप ग्रुप

डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाचे पुरस्कार जाहीर

Leave a Comment