April 18, 2024
Dilip Gangdhar Poem on Farm in Dream
Home » अशीच अमुची शेती असती….
कविता

अशीच अमुची शेती असती….

अशीच अमुची शेती असती....

अशीच असती अमुची बक्कळ शेती,
अहो, नोकरीच कधी मी केली नसती...!

कौलारू छपराची असती तेथे वस्ती,
गाय-म्हशी अन् दोन खिल्लारीही सोबती...

कबूल, व्यवसाय-नोकरदारांची बाजारी चलती,
परी, भूमीस भुकेली बाला भेटलीच असती ...

दह्या-दुधासह रवाळ तुपाचा घमघमाट असता,
शेजाऱ्यांना टाकभर जास्तीचाच रतीब असता...

ऊस पिकाला दिला असता हो मी फाटा,
घेतला असता भात, ज्वारी, गहू न् टमाटा...

मेथी, पोकळा, भेंडी, गवारीही केली असती,
मध्यस्थांची जिरवून, स्वस्तामध्ये विकली असती...

पाला-पाचोळा, शेण-मुताला कुजवून गारी,
मातीसाठी बनवले असते सेंद्रीय खत लै भारी...

जहरी रासायनिक खतांना देऊन फाटा,
उचलला असता मी इको फ्रेंडलीचा वाटा...

वाचून माझे हे इमले सारे, हसू नका हो,
स्वप्नरंजनाचे सुख तरी हिरावू नका हो...

कवी - दिलीप गंगधर
९८८११३३९२९

Related posts

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली तर शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील का ?

चक्क बर्फाच्या हॉटेलमध्येच मुक्काम ! (व्हिडिओ)

कृषि सल्लाः उन्हाळ्यात पिकांची आणि पशूंची अशी घ्या काळजी..

Leave a Comment