Site icon इये मराठीचिये नगरी

देशात 3288.52 लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज

Estimated foodgrain production in the country is 3288.52 lakh tonnes

Estimated foodgrain production in the country is 3288.52 lakh tonnes

देशात यावर्षी एकूण 3288.52 लाख टन अन्नधान्य उत्पादन होईल असा अंदाज, गेल्या 5 वर्षांतील सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा यावर्षी 211.00 लाख टन अधिक धान्य उत्पादन होणार

नवी दिल्‍ली – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने वर्ष 2023-24 साठी प्रमुख कृषी उत्पादनांचा तिसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे.गेल्या कृषी वर्षापासून, उन्हाळी हंगाम रब्बी हंगामापासून विलग करण्यात आला असून तो तिसऱ्या आगाऊ अंदाजामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. म्हणून, लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन आणि उत्पन्नाच्या या आगाऊ अंदाजामध्ये खरीप, रबी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामाचा समावेश करण्यात आला आहे.

प्रामुख्याने राज्य कृषी सांख्यिकी अधिकाऱ्यांकडून (एसएएसएएस) मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा अंदाज तयार करण्यात आला आहे. हाती आलेल्या आकडेवारीची वैधता तपासून, दूरस्थ संवेदक प्रणाली, साप्ताहिक पीकविषयक हवामान निरीक्षक गट आणि इतर संस्थांकडून मिळालेल्या माहितीशी ती जोडण्यात आली. त्याबरोबरच, हा अंदाज तयार करताना, वातावरणाची स्थिती, पूर्वीचे कल, दरातील चढउतार, मंडयांमध्ये कृषी उत्पादनांचे आगमन इत्यादी घटक देखील विचारात घेण्यात आले.

विविध पिकांच्या उत्पादनांचे तपशील असे –

एकूण अन्नधान्य – 3288.52 लाख टन

एकूण तेलबिया– 395.93 लाख टन

ऊस– 4425.22 लाख टन

यावर्षी देशात एकूण 3288.52 लाख टन अन्नधान्य उत्पादन होईल असा अंदाज असून हे उत्पादन,वर्ष 2022-23 मधील धान्य उत्पादनापेक्षा किंचित कमी आहे. या अंदाजानुसार, गेल्या 5 वर्षांत (वर्ष 2018-19 ते 2022-23 मध्ये) झालेल्या 3077.52 लाख टन सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा यावर्षी 211.00 लाख टन अधिक धान्य उत्पादन होणार आहे. खरीपातील पीक उत्पादनाचे अंदाज तयार करताना, पीक कापणी प्रयोगांवर (सीसीईएस) आधारित उत्पन्न देखील विचारात घेतले आहे.

बागायती पिकांचे क्षेत्र आणि उत्पादनाबाबतचा 2023-24 वर्षासाठी दुसरा आगाऊ अंदाज

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि इतर सरकारी स्रोत संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संकलित केलेल्या विविध बागायती पिकांचे क्षेत्र आणि उत्पादनाबाबतचा  2023-24 वर्षासाठी दुसरा आगाऊ  अंदाज प्रसिद्ध केला आहे.

एकूण फलोत्पादन2022-232023-24(पहिला आगाऊ अंदाज)2023-24(दुसरा आगाऊ अंदाज)
क्षेत्रफळ (दशलक्ष हेक्टरमध्ये)28.4428.7728.63
उत्पादन (दशलक्ष टन मध्ये)355.48355.25352.23

वर्ष 2023-24 चे ठळक मुद्दे (दुसरा आगाऊ अंदाज)

Exit mobile version