February 1, 2023
five more sites from India included in Ramsar spots
Home » रामसर स्थळांच्या यादीत भारतातील आणखी पाच स्थळांचा समावेश
काय चाललयं अवतीभवती पर्यटन फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रामसर स्थळांच्या यादीत भारतातील आणखी पाच स्थळांचा समावेश

नवी दिल्ली – रामसर स्थळांच्या यादीत देशातील महत्त्वाच्या पाच (5) नवीन पाणथळ स्थानाचा समावेश  केला आहे. यामुळे देशातील रामसर स्थळांची संख्या आता 54 इतकी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव यांनी दिली आहे.

नव्याने समावेश केलेल्या स्थळात तामिळनाडूमधील तीन पाणथळ प्रदेश कारीकिली पक्षी अभयारण्य, पल्लिकरणाई  पाणथळ राखीव अभयारण्य आणि पिचावरम कांदळवन, तर मिझोराममधील पाला पाणथळ प्रदेश आणि मध्य प्रदेश मधील एक पाणथळ स्थान सख्य सागर यांचा समावेश आहे. देशातील रामसर स्थळांची संख्या आता 49 वरून 54 इतकी झाली आहे.

पिचावरम कांदळवन हे जगातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे कांदळवन म्हणून ओळखले जाते. तामिळनाडूमधील कुद्दलोर जिल्ह्यातील चिदंबरम शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर आले. पिचावरम खारफुटीचे जंगल उत्तरेकडील वेल्लर एस्टुअरी आणि दक्षिणेतील कोलिडम एस्टुअरी या दोन प्रमुख खडकांच्या मधोमध वसलेले आहे. बॅकवॉटर्स वेल्लर आणि कोलिडम नदी प्रणालीद्वारे एकमेकांशी जोडलेले आहेत. यामध्ये रोईंग, कायाकिंग आणि कॅनोइंग सारख्या जल खेळांना भरपूर वाव देण्यात येतो. हे एक सुविकसित खारफुटीचे जंगल असून त्यात लहान बेटे आहेत.

पिचावरम कांदळवन

तामिळनाडूमधील कांचिपुरम जिल्ह्यात कारिकीली पक्षी अभयारण्य आहे. 61.21 हेक्टर इतका या अभयारण्याचा विस्तार आहे. सुमारे 115 प्रजातीचे पक्षी या अभयारण्यात वास्तव्य करतात. ग्रीब्स, ग्रे पेलिकन, कॉर्मोरेंट, एग्रेट्स, डार्टर, स्पूनबिल, नाइट-हेरॉन आणि व्हाइट इबिस इत्यादी प्रजातींचा यामध्ये समावेश होतो. सप्टेंबर व ऑक्टोंबरमध्ये स्थलांतरीत पक्षी येथे वास्तव्यास येतात.

कारिकीली पक्षी अभयारण्य

तामिळनाडूतील चेन्नई शहरामध्ये पल्लिकरणाई  ही गोड्यापाण्याची पाणथळ जागा आहे. शहरातील एकमेव जिवंत आर्द्रभूमी इकोसिस्टम आहे. दक्षिण भारतातील काही आणि शेवटच्या उरलेल्या नैसर्गिक पाणथळ जागांपैकी ही एक जागा आहे. या दलदलमय जागेमध्ये अनेक दुर्मिळ किंवा संकटग्रस्त आणि धोक्यात आलेल्या प्रजाती आहेत. देशाच्या अंतर्गत आणि देशाबाहेरील विविध ठिकाणाहून हजारो स्थलांतरित पक्ष्यांसाठी चारा आणि प्रजनन क्षेत्र म्हणून हे कार्य करते.

पल्लिकरणाई

मिझोरममधील सिअहा जिल्ह्यात पाला पाणथळ प्रदेश आहे. फुरा गावापासून सहा किलोमीटर अंतरावर हा प्रदेश आहे. 1850 हेक्टर इतका विस्तृत प्रदेश या पाणथळ जागेने व्यापलेला आहे. नद्या आणि प्रवाहांसाठी पाण्याचा बारमाही स्रोत म्हणून या भागातील जलशास्त्रीय व्यवस्था टिकवून ठेवण्यात पाला पाणथळभूमी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, ज्यावर सात गावे आपली उपजीविका जमा करण्यासाठी अवलंबून आहेत. मिझोरममधील पाला पाणथळ प्रदेश विविध प्रकारच्या वनस्पती आणि जीवजंतूंना आधार देतो, ज्यात २२७ प्रजाती वनस्पती, ७ प्रजाती सस्तन प्राणी, पक्ष्यांच्या २२२ प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या २१ प्रजाती, उभयचर प्राण्यांच्या ११ प्रजाती आणि माशांच्या ३ प्रजातींचा समावेश आहे. आर्द्रभूमीमध्ये सांबर हरीण (रुसा युनिकलर), एशियाटिक ब्लॅक बेअर (उर्सस थिबेटनस) आणि स्लो लॉरिस (नायक्टिबेटस कॉकॅंग) आणि हुलॉक गिबन (हूलॉक हूलॉक) सारख्या अनेक जागतिक स्तरावर धोकादायक प्रजातींचे संगोपन केले जाते.

पाला पाणथळ प्रदेश
पाला पाणथळ प्रदेश

मध्यप्रदेशातील माधव राष्ट्रीय उद्धानाजवळ सख्यसागर तलाव आहे. १९२० च्या दशकाच्या सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या या सरोवरात मार्श मगरी, भारतीय अजगर, सरडे आणि इतर अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विविध प्रजातींचे घर आहे. या तलावातील पाण्याच्या सुंदर विस्तारावर बोटीतून प्रवास करण्याच आनंद येथे येणारे पर्यटक घेतात.

Related posts

आयुर्वेदातील वैद्यांना वनसंवर्धनाची सक्ती करण्याची गरज

शोभेच्या वनस्पतीत अधिक फुलोरा अन् जोमदार वाढीसाठी संशोधकांनी शोधली ‘ही’ संप्रेरके

‘ अक्षरसागर ‘ चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment