March 29, 2024
Guidelines on Agriculture Chemicals book by Ankush Chormule
Home » कृषि रसायनाबाबत शेतकऱ्यांना साक्षर करणारे पुस्तक
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषि रसायनाबाबत शेतकऱ्यांना साक्षर करणारे पुस्तक

👨🏻‍⚕️कृषीरसायने पीकनिहाय सल्ला व सुरक्षा पुस्तकाच्या निमित्ताने 👨🏻‍⚕️


2018 साली शेतकरी मित्रांना कीडनाशकांची माहिती व्हावी या उद्देशाने कृषीरसायने या पुस्तकाची निर्मिती डॉ. अंकुश चोरमुले यांनी केली. सलग सहा महिने अभ्यास करून त्यांनी सर्व माहिती एकत्रित केली आणि कृषीरसायने पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. तेव्हापासून एकूण तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यामध्ये काळानुसार बदल ही करण्यात आला आहे.

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कीटकनाशकांची पीकनिहाय माहिती दिली आहे. कोणत्या पिकावर कोणत्या किडीसाठी कोणते कीटकनाशक वापरावे याची परिपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. शेतकरी मित्र 👳🏻‍♀️ शेती करताना कीड व्यवस्थापनासाठी कृषी दुकानदार किंवा मित्रमंडळींच्या सल्ल्यावर अवलंबून असतात. जर शेतकऱ्याकडे हे पुस्तक असेल तर त्यांना सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. कीटकनाशकांचा पीएचआय, एम आर एल याबाबतही शेतकरी या पुस्तकामुळे साक्षर होऊ शकेल. कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्यांना शेतकरी मित्रांना सल्ला देताना हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकते.

कृषि रसायने पीक निहाय सल्ला अन् सुरक्षा

कृषि रसायने या पुस्तकात काय काय आहे…

🌀 या पुस्तकामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक पिकामध्ये पडणाऱ्या किडी रोगांची माहिती दिली आहे.
🌀 सर्व फळबाग, भाजीपाला, तृणधान्य, कडधान्ये, नगदीपिके यावर करणाऱ्या किडी आणि रोगांची माहिती सविस्तर पिकानुसार दिली आहे.
🌀 कोणत्या किडीवर कोणते कीडनाशक वापरावे, कोणत्या रोगांवर कोणते बुरशीनाशक वापरावे, जैविक कीटकनाशकांचा वापर कसा करावा याची सर्वोतोपरी माहिती आपणास या पुस्तकामधून भेटेल.
🌀 निर्यातक्षम पीक उत्पादनासाठी पी एच आय, एम आर एल याबाबतची माहिती या पुस्तकात आहे.
🌀 औषधांची व्यापारी नावे, शास्त्रीय नावे, बाजारात कोणत्या नावाने औषध उपलब्ध आहे याची माहिती, तसेच प्रत्येक औषधांत कोणत्या घटकांचा समावेश केलेला आहे याची सर्व माहिती यातून दिली आहे.
🌀दोन औषधे एकत्रितरीत्या फवारायची असल्यास कोणती औषधे एकत्र करावी, त्यांचे प्रमाण, पाण्याचे प्रमाण या सर्वांची अचूक माहिती या पुस्तकात भेटेल.
🌀सरकारकडून बंदी घालण्यात आलेली औषधे याची अचूक माहिती.

पुस्तकाचे नाव – कृषीरसायने पीकनिहाय सल्ला व सुरक्षा
लेखक – डॉ. अंकुश चोरमुले
प्रकाशक – शिवांष पब्लिकेशन, आष्टा
पुस्तकाची किंमत -450
🌀पुस्तकांच्या बुकिंगसाठी संपर्क – 📱9960285006, 📱7709680910

Related posts

Photos : सुरात गाणारा टकाचोर…

वासुदेव काटे यांचे द्राक्ष बागांसदर्भात मार्गदर्शन

ढगाळ वातावरणामुळे थंडी काहीशी कमी

Leave a Comment