March 28, 2024
How To Develop Mindset article by Ravindra Khire
Home » माइंड सेट कसा तयार कराल ?
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

माइंड सेट कसा तयार कराल ?

मित्रहो, जर मराठी माणसाला व्यवसायच जमला नसता तर देशातील व परदेशातील यशस्वी उद्योजकांमध्ये इतके मराठी उद्योजक नसते. व्यवसायात मिळणारे यश हा तो व्यवसाय कोणता आहे, यापेक्षा तो कोणत्या मानसिकतेने केला जातो यावर अवलंबून असते.

रवींद्र खैरे


मोबाईल – 8149456986

कोरोनाच्या काळाने माणसाला नोकरीच्या मर्यादा दाखवून दिल्या. उत्तम नोकरी, मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती हे सूत्र कोरोना महामारीमुळे बऱ्यापैकी बदलले. अनेक तरुण व होतकरू मुले स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करू लागले आहेत. आठ ते बारा तास दुसऱ्याकडे नोकर होऊन काम करण्यापेक्षा स्वतःच्या व्यवसायात मालक होऊन राहिलेले कधीही उत्तम ही मानसिकता ठेवून. अनेक तरुण स्वतःचा व्यवसाय उभा करण्याकडे वळत आहेत. उद्योग व्यवसायात असलेल्या अमर्याद संधी नक्कीच देशातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यास मदत करतील. पण खरचं उद्योग व्यवसाय करण्यासाठी आलेल्या सर्वांचा बिझनेसचा माईंड सेट तयार झाला आहे का.? हे तपासून पाहावे लागेल.

कारण बरेच जण व्यवसायातून मिळणारा नफा, त्यातून येणारी स्थिरता, सध्या उद्योजकाला मिळत असलेले थोडेसे ग्लॅमर, स्वतःच बॉस होण्याची इच्छा, हे सर्व पाहून उद्योग व्यवसायात प्रवेश करतात. बँकांचे कर्ज काढतात, प्रचंड उत्साहाने व्यवसाय सुरू करतात. पण जेव्हा व्यवसायात छोट्यामोठ्या अडचणी यायला सुरुवात होते , ग्राहकाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. तेव्हा अत्यंत उत्साहाने उद्योग व्यवसायात आलेले हे लोक. निराशेच्या गर्तेत सापडतात, योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, अडचणींवर मात करता आली नाही तर प्रसंगी व्यवसाय बंद करावा लागतो. तेव्हा मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही ही नेहमीचीच ठेवणीतली म्हण प्रत्येकाच्या तोंडावर फेकली जाते व अपयशाचे खापर व्यवसायावर फोडले जाते.

पण मित्रहो, जर मराठी माणसाला व्यवसायच जमला नसता तर देशातील व परदेशातील यशस्वी उद्योजकांमध्ये इतके मराठी उद्योजक नसते. व्यवसायात मिळणारे यश हा तो व्यवसाय कोणता आहे, यापेक्षा तो कोणत्या मानसिकतेने केला जातो यावर अवलंबून असते. म्हणून नव्याने व्यवसायात येऊ पाहणाऱ्या तरुणांनी उद्योग व्यवसाय सुरू करण्याअगोदर बिझनेचा माईंड सेट तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. व्यवसायाची मानसिकताच आलेल्या संकटांवर मात करण्याची प्रेरणा देते. नव उद्योजकांचा बिझनेस माईंड सेट तयार व्हावा यासाठीच्या काही टिप्स. पहा आपल्या उपयोगी आल्या तर.

1) आपण कोणताही छोटा मोठा व्यवसाय करणार असाल तर त्या व्यवसायाचे योग्य प्रशिक्षण घेऊनच व्यवसायात प्रवेश करा. कारण पैसा असलेला प्रत्येक माणूस व्यवसायात यशस्वी होतोच असे नाही, त्यासाठी योग्य ज्ञान, कौशल्य आणि सकारात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता असते.

2) व्यवसायाची मानसिकता तयार होण्यासाठी व्यवसाय करणार्‍या माणसांची संगत करा. दिवसातला जास्तीत जास्त वेळ बिझनेसमन लोकांबरोबरच घालवा. कारण नोकरी करण्याची मानसिकता असलेला व्यक्ती आपल्याला नकारात्मक सल्ले अधिक देतो.

3) आपल्या शहरात असलेल्या व्यवसायिकांच्या विविध ग्रुपमध्ये जाणीवपूर्वक सामील व्हा. त्यांच्या बैठकांना हजर रहा. त्यांच्याशी बोलत राहा, त्यांचा सल्ला घ्या.

4) व्यवसायाचे मार्गदर्शन करणाऱ्या विविध शासकीय संस्थांशी नेहमी संपर्कात राहा, शक्य असल्यास चांगले ज्ञान व कौशल्य मिळवण्यासाठी त्यांच्या कार्यशाळामध्ये सहभागी व्हा.

5) आपल्या व्यवसायाचे मार्गदर्शन करणारे मासिक अथवा वर्तमानपत्र खरेदी करत चला व वाचत जा.

6) आपल्या व्यवसायाबद्दल नकारात्मक बोलणाऱ्या माणसांपासून जाणीवपूर्वक लांब राहा.

7) माणसांच्या बदलणार्‍या गरजांचा व बाजारपेठेच्या बदलणाऱ्या स्वरूपाचा नेहमी अभ्यास करत चला. यातून मिळणाऱ्या संधीचे सोने करण्यासाठी आपण सतत तयार असावे.

8) योग्य मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींच्या कायम संपर्कात राहा. व्यवसाय मार्गदर्शनाची पुस्तके वाचा व स्वतःला अपडेट ठेवा.

लक्षात असू द्या, व्यवसाय कोणता आहे यापेक्षा तो व्यवसाय कोण करतो यावर त्या व्यवसायाचे यश अवलंबून असते. व्यवसायात छोटा अथवा मोठा हा भेद कधीच असत नाही. व्यवसाय करणाऱ्या माणसांचे विचार छोटे की मोठे यावरच व्यवसायाचे भवितव्य अवलंबून असते, म्हणून नव्याने व्यवसायात येऊ पाहणाऱ्या नवउद्योजकांनो स्वतःचे विचार बदला आयुष्य बदलेल. सकारात्मक व्यवसायिक मानसिकता नक्की तयार होईल.

Related posts

एल-निनो अन् येणारा पावसाळा, याचा शेतीवरील परिणाम

घटस्थापनेनिमित्त पंढरपूर विठ्ठल मंदिरात बांधलेली पुजा…

कांदा खरेदीसाठी बाजारात तत्काळ हस्तक्षेप करण्याचे नाफेड आणि एनसीसीएफला केंद्राचे निर्देश

Leave a Comment