March 29, 2024
mahatma Phule Khanwadi
Home » खानवडीत महात्मा फुले साहित्य संमेलनाचे आयोजन
काय चाललयं अवतीभवती

खानवडीत महात्मा फुले साहित्य संमेलनाचे आयोजन

महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी दि. २७ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी मराठी साहित्य संशोधन परिषद व अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी कवी, लेखक यांनी दशरथ यादव यांच्याशी ९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा. या निमित्ताने महात्मा फुले यांच्यावर दशरथ यादव यांनी लिहीलेला लेख….

महात्मा फुले (इ.स.१८२७ – नोव्हेंबर २८ १८९०) हे मराठी, भारतीय समाजाचे आधुनिक समाजसुधारक होते.

त्यांचे मूळ गाव – कटगुण (सातारा) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. कटगुणहून ते पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आले. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे जमिनीचा सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. सासवडपासून सात किलोमीटर अंतरावरील खानवडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे तेथे घर होते. जमिन होती. अजूनही त्यांच्या नावाने सातबारा तिथे पाहायला मिळतो.

संत तुकारामांचा प्रभाव

संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा त्यांच्यावर प्रभाव होता. सामाजिक प्रबोधनासाठी तुकारामांनी अंभग रजना केली त्याच अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. छत्रपती शिवाजीमहाराजांची पहिली शिवजंयती महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन साजरी केली. रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधिचा शोध त्यांनी लावला. समाधीची पूजा केली..रयतेचे राज्य उभे करणाऱ्या शिवाजीराजांवर त्यांनी कुळवाडीभूषण नावाचा पहिला पोवाडा लिहिला.

मुलींची पहिली शाळा

इ.स. १८२७ – जन्म कटगुण, सातारा जिल्हा येथे झाला. इ.स. १८३४ ते १८३८ – पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले. इ.स. १८४० – सावित्रीबाईंशी विवाह झाला. इ.स. १८४१ ते १८४७ – स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले. इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.

इ.स. १८४७ – थॉमस पेन यांच्या ‘राईट ऑफ मॅन’ या ग्रंथाचा अभ्यास. इ.स. १८४८ – मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत ब्राम्हण वर्णीयांकडून अपमान झाला. इ.स. १८४८ – भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले. सप्टेंबर ७, इ.स. १८५१ – भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात झाली. इ.स. १८५२ – पूना लायब्ररीची स्थापना केली. मार्च १५, इ.स. १८५२ – वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. नोहेंबर १६, इ.स. १८५२ – मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार. इ.स. १८५३ – ‘दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स’ स्थापन केली.

स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी, रात्रशाळा, मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न, विधवाविवाहास साहाय्य, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप, गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला, हौद अस्पृश्यांसाठी खुला, सत्यशोधक समाजची स्थापना, शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले, स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य, पुणे नगर पालिकेचे सदस्य, दारू दुकानाना विरोध, पहिल्या कामगार संघटनेची स्थापना, ‘विल्यम हंटर शिक्षण आयोगा’ समोर निवेदन, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी, सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणले.

साहित्यक्रांती

मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून ‘महात्मा’ ही पदवी प्रदान केली. २८ नोव्हेंबर, इ.स. १८९० – पुणे येथे त्यांचे निधन झाले. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रत रुजवण्यासाठी सत्यशोधक दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजषी शाहू महाराजांनी समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेत्तर चळवळीने अवघा महाराष्ट्र जेधे जवळकर जोडीने ढवळून काढला. देशाचे दुश्मन हे त्यांचे पुस्तक प्रचंड गाजले.
तृतीय रत्न नाटक -इ.स. १८५५
पवाडा राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा- पोवाडा इ.स. १८६९
ब्राह्मणांचे कसब लेखसंग्रह- इ.स. १८६९
गुलामगिरी लेखसंग्रह- इ.स. १८७३
शेतकऱ्यांचा आसूड- लेखसंग्रह इ.स. १८८३
सत्सार नियतकालिक- इ.स. १८८५
इशारा लेखसंग्रह- इ.स. १८८५
सार्वजनिक सत्यधर्म लेखसंग्रह- इ.स. १८८९

‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
“ विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

समाजात समता, बंधुता यावी म्हणून काम केले, त्यांच्या मूळ खानवडी गावी पत्रकार, कवी, लेखक दशरथ यादव यांनी १४ वर्षापूर्वी राज्य स्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन सुरू करुन सत्यशोधक विचारांचा प्रसार केला, ग्रंथ दिंडी, पुरस्कार वितरण, परिसंवाद, कथा कथन, नाट्य प्रयोग, कविसंमेलन असे कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जाते, राज्य भरातील साहित्यिक दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात,

Related posts

आपटे वाचन मंदिरातर्फे पुरस्कारांसाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

हिरवळीचे खत: ताग आणि धेंचा

भरली ढोबळी मिरची…

Leave a Comment