March 29, 2024
New Year Poem by Arvind Ganpule
Home » नवीन वर्ष…
कविता

नवीन वर्ष…

नवीन वर्ष

वेचून घ्या कोमेजल्या
फुलांच्या या पाकळ्या
सोडून द्या आठवणी
कधी नव्हत्या आपल्या

गळुन जातील पाकळ्या
गंध तरी उरेल बाकी
विसरता विसरणार नाही
येतील नऊ हे नाकी

दुःखाचे क्षण असे अनेक
आले होते गतकाली
सांभाळले तुम्ही स्वतःला
आपण आपले वाली

मोकळी करून ही ठेवा
सुख दुःखांची झोळी
काय लिहीले पुढील वर्षी
नियतीने तुझ्या भाळी

नका ठेऊ हिशोब आता
काय हरलो जिंकलो
जात राहिलोय पुढे पुढे
ना कधीच हो थांबलो

निघून गेले वर्ष जुने हे
येऊ घातले हे नवे
आशा आकांक्षांचे मग
उडू लागले हे थवे

कोण चुकले काय चुकले
जाऊ सगळे विसरून
स्वागत करूया नववर्षाचे
दोन्ही बांहू हे पसरून

कवी – अरविंद गणपुले

Related posts

झंझावात

आपटे वाचन मंदिराचे साहित्य पुरस्कार जाहीर

स्त्री जन्मा तुझी कहाणी! हृदयी अमृत नयनी पाणी!

Leave a Comment