March 29, 2024
Home » परकाया प्रवेश…
मुक्त संवाद

परकाया प्रवेश…

पण हे परकाया प्रवेश करणे इतकेही सोपे नसते. त्या वेदना किंवा तो आनंद आपल्याला त्या व्यक्तीच्या आत डोकावून बघावा लागतो. लिहीलेल्या सगळ्याच भावना प्रेम असो विरह असो प्रेमभंग असो किंवा मग खून मारामारी बलात्कार हे सगळे प्रकार लिहीताना असेच परकाया प्रवेशाने लिहीता येते.

सौ सुनेत्रा विजय जोशी

सुनेत्रा विजय जोशी,

शिर्षक वाचून. हादरला असाल ना. नेहमीच काहीतरी वेगळे लिहिणारी मी आज हे काय भुताटकी किंवा अघोरी विद्येबददल लिहीतेय. बापरे… सुनेत्रा हे पण करते? शिकली तरी कधी नी कुठून.? जपुनच राहिले पाहिजे हिच्यापासून. असेही मनात आले असेल ना? पण घाबरू नका. हा वेगळा प्रकार आहे. 

कुठलाही लेखक लेखिका जेव्हा कथा कविता लिहीत असतात तेव्हा ते त्या त्या पात्रात परकाया प्रवेशच करत असतात.. तेव्हा घाबरून रोखलेला श्वास सोडा आता. एखादे दिवशी सकाळी बाहेर पडलो आणि शेजारची तरुण बाई प्रसन्न फुले तोडतांना जरी दिसली तरी लगेच आम्ही जातोच तिच्यात. रात्र रंगलेली दिसते. नवरा काय म्हणाला असेल त्यावर ही काय म्हणाली असेल इतपर्यंत आम्ही जाणून मगच तिच्या शरीरातून बाहेर पडतो. पण तेच तिचा चेहरा पडलेला दिसला तर मग काहीतरी बिनसले वाटते. एखादी केलेली. फर्माईश तरी पूर्ण झाली नसणार किंवा काही भांडण तरी झाले असणार. मग ते कशावरून यावर सुध्दा आमच्या कडे पन्नास कारणे तयार असतात कथेत घालायला. तेच जर ती बाई प्रौढ असेल तर अजुनच वेगळे. पुरुष असेल तर मग अजुनच वेगळे. 

मौनी महाराज शिवाजी महाराज यांचे गुरु…वेबसाईट पाहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा
 https://www.freewebs.com/mounimaharaj/

कधी कधी कुणी मैत्रीण किंवा नातेवाईक त्यांची एखादी कथा किंवा व्यथा बोलून दाखवतात. मग काय आमचा परकाया प्रवेश लगेच सुरू. तिला जसा  त्रास असेल तो आम्ही अनुभवतो आणि मग तो लिखाणात उतरला की वाचणारा म्हणतो खरेच किती भोगायला लागले ना. पण हे परकाया प्रवेश करणे इतकेही सोपे नसते. त्या वेदना किंवा तो आनंद आपल्याला त्या व्यक्तीच्या आत डोकावून बघावा लागतो. लिहीलेल्या सगळ्याच भावना प्रेम असो विरह असो प्रेमभंग असो किंवा मग खून मारामारी बलात्कार हे सगळे प्रकार लिहीताना असेच परकाया प्रवेशाने लिहीता येते. 

अन्यथा सगळे अनुभव आयुष्यात कसे येणार? तसे आपण सगळेच चेहरा बघून दुःखी की आनंदी वगैरे ओळखू शकतोच पण त्या मागचे मात्र परकाया प्रवेश जमल्या शिवाय नाही जाणून घेता येत. पण हा परकाया प्रवेश करायला मन खूप तरल लागते. मग पक्षांच्या मनातले किंवा झाडांच्या आत पण काय सुरु आहे ते कळते.मला माझ्या एका ओळखीतल्या स्नेह्याने जेव्हा रस्त्यात भेट झाली तेव्हा तो सहज म्हणाला दिसत रहा. आपण भेटत रहा म्हणतो तसेच अगदी सहज. तो स्नेही माझ्या मुलाच्या वयाचा आहे. हो उगाच गैरसमज नको. नसत्या शंकाकुशंका पण नकोत. पण चांगला वाचक आहे म्हणून मैत्र. मग तो शब्द मनातून जाईचना. त्याच्या डोळ्यातला आनंद बघून मग मी लगेच परकाया प्रवेश केलाच. काय काय मनात येवू शकते हे मग माझ्या तू दिसत रहा. या कवितेत लेखणीतून उतरलेच. 

अगदी वारा कानात काय सांगून गेला हे पण कळते. किंवा सोबत सुगंध कुणाचा घेऊन आला हे पण जाणवते.  बिलगणारा झुळूकीचा तो स्पर्श  पण अगदी खरा वाटतो. आता देखिल हे वाचून कुणाकुणाची काय प्रतिक्रिया असेल ते मी परकाया प्रवेश करुन जाणून घेऊ शकतेच. असा हा माझा परकाया प्रवेश हं…. 

– सौ सुनेत्रा विजय जोशी, रत्नागिरी 

Join and Like Our Page इये मराठीचिये नगरी for updates and Details…
https://www.facebook.com/IyeMarathichiyeNagari/

Related posts

उजळता एक पणती…

अणुऊर्जा क्षमता 2031 पर्यंत 22480 मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे नियोजन

पुर्वग्रह दुषित..

Leave a Comment