February 1, 2023
Unnati Institute stall in Danapur Marathi Boli Samhelan
Home » कोरकू बोलीसाठी उन्नती संस्थेचा उपक्रम
करिअर अन् स्पर्धा परिक्षा काय चाललयं अवतीभवती

कोरकू बोलीसाठी उन्नती संस्थेचा उपक्रम

  • कोरकूच्या प्रशिक्षणासाठी उन्नती संस्थेने घेतला ध्यास
  • मराठी अभ्यासक्रमाचे कोरकूमध्ये रूपांतर
  • आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी उन्नतीचे विविध उपक्रम

दानापूर ( जि. अकोला ) येथे आयोजित आठव्या मराठी बोली साहित्य संमेलनामध्ये कोरकू भाषेसाठी कार्य करणाऱ्या उन्नती संस्थेने पुस्तकांचा आणि त्यांच्या उपक्रमांची माहिती देणारा स्टॉल उभारला होता. त्यांच्या या कार्यामुळे हा स्टॉल संमेलनामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मराठी शिकण्यात येणारी अडचण असो किंवा प्राथमिक शाळेतील शिक्षकांना कोरकू विद्यार्थ्यांना शिकवताना येणारे अडचण. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन मुंबईतील उन्नती या संस्थेने कोरकू भाषेत अभ्यासक्रम रूपांतरित करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याचा वसा हाती घेतला आहे. दानापूर येथील मराठी बोली साहित्य संमेलनात उन्नती संस्थेने आपल्या कार्याचा परिचय देणारा स्टॉल मांडला होता.

उन्नती संस्था ही मूळची मुंबई येथील असून पाठ्यक्रम कोरकूमध्ये रूपांतरित करून अभ्यास सोपा करण्याचे काम करीत आहे. गेल्या सात वर्षांपासून ही संस्था आदिवासी भागात काम करीत आहे. विविध गोष्टींची पुस्तके, वाचनपाठ, शैक्षणिक साहित्य, कविता या संस्थेने कोरकूमध्ये रुपांतरित केले आहेत. ही संस्था चिंचपाणी, खिरकुंड, डांगरखेड, जनुना या चार गावांमध्ये काम करीत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात ही संस्था कार्यरत आहे. सुभाष केदार, रतनलाल जांबेकर, प्रकल्पाच्या सल्लागार मुंबई येथील राजश्री दामले यांनी या कार्याविषयी माहिती दिली. हेमांगी जोशी या संस्थेच्या मुख्याधिकारी आहेत

उन्नती संस्थेने कोरकू भाषा अभ्यासवर्ग ही सुरु केले आहेत. २४ दिवसांचा कोर्स यासाठी तयार केला आहे. आत्तापर्यंत शिक्षकांसह 700 जणांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.

Related posts

…अन् एन. डी. राजू शेट्टींना म्हणाले, आंदोलन कसं कायं चाललयं

जाणून घ्या बायबल या ग्रंथाबद्दल…

सृष्टीसौंदर्यातून साकारलेल्या भावनात्मक बालकथा

Leave a Comment