December 4, 2024
IFFI includes films on various themes such as mystery based on human relationships
Home » इफ्फीमध्ये मानवी संबंधांवर आधारित, रहस्यमय अशा विविध संकल्‍पनांवरील चित्रपटांचा समावेश
मनोरंजन

इफ्फीमध्ये मानवी संबंधांवर आधारित, रहस्यमय अशा विविध संकल्‍पनांवरील चित्रपटांचा समावेश

गोवा येथे सुरू असलेल्या 55 व्या इफ्फीमध्‍ये वैशिष्‍ट्यपूर्ण चित्रपटांचे अनावरण : ‘कारखानू’, ‘गुगल मॅट्रीमोनी’, ‘राडोर पाखी’; अशा मानवी संबंधांवर आधारित, रहस्यमय अशा विविध संकल्‍पनांवरील चित्रपटांचा समावेश

#IFFIWood गोवा – येथे सुरू असलेल्या 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) तीन अपवादात्मक, वैशिष्‍ट्यपूर्ण  चित्रपटांचे  प्रदर्शन करण्‍यात आले.  यामध्‍ये गुजराती चित्रपट, ‘कारखानू’, आसामी चित्रपट, ‘राडोर पाखी’ आणि ‘गुगल मॅट्रीमोनी’ या चित्रपटांचा समावेश होता.  दूरदर्शी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी तयार केलेले हे चित्रपट या क्षेत्रातील  मौल्‍यवान हि-यासारखे आहेत. यामध्‍ये रहस्‍यमय,  विनोद, भयपट, अस्सल मानवी संबंधाचा शोध आणि जीवनातील आव्हाने स्वीकारण्याची ताकद अशा अनेक भावभावनांचे मिश्रण असलेले हे  चित्रपट आहेत.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, ‘कारखानू’ चे दिग्दर्शक ऋषभ थंकी यांनी सामायिक  केले की, हा चित्रपट गुजरातच्या लोककथांमध्ये खोलवर रुजलेला आहे. सुरुवातीला एक शॉर्ट फिल्म म्हणून तयार केली गेली होती, नंतर ती पूर्ण-लांबीची फीचर फिल्म बनवण्यात आली. अभिनेता, पार्थ दवे, याने चित्रपटाचे वर्णन दोन वर्षांचा प्रवास, थोडे व्‍यंगात्मक लेखन आणि वन-कट प्रकल्प असे केले. या  चित्रपटाचा निर्मिती खर्च   पार्थ दवे, यांनी स्वत:च केला आहे.  त्यामुळेच या चित्रपटाचे इफ्फीमध्‍ये प्रदर्शन होणे हे गुजराती चित्रपट उद्योगासाठी एक नवीन मैलाचा दगड ठरले आहे.

यावेळी प्रदर्शित केलेला आणखी एक चित्रपट म्हणजे, ‘गुगल मॅट्रिमोनी’ याचे दिग्दर्शक श्रीकार्थिक एस. एस. यांनी स्पष्ट केले की, हा चित्रपट म्हणजे मानववंशशास्‍त्राचा जणू एक भाग आहे. चित्रपट निर्माते, अभिनव जी अत्रे यांनी नमूद केले की,  तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर कसा प्रभाव पडतो याचा शोध  या चित्रपटाच्या कथेमध्ये घेतला जातो.

अभिनेते देव  म्हणाले की   इफ्फीमध्ये मिळालेल्या कौतुकाविषयी आपली टीम आदर व्यक्त करीत आहे.  यामुळे उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा मिळेल. चित्रपटाच्या व्यावसायिक व्यवहार्यतेबद्दल विचारले असता, त्यांनी जोर दिला की,  त्यांचे लक्ष पैसे कमवण्यापेक्षा अर्थपूर्ण चित्रपट तयार करण्यावर आहे.

‘राडोर पाखी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. बॉबी शर्मा बरुआ यांनी केले आहे. यामध्‍ये  ‘स्पाइनल मस्क्युलर ऍंट्रोफी’ म्हणजेच मणक्याचा एक प्रकारचा आजार  असलेल्या मुलीचे संवेदनशील चित्रण केले आहे. चित्रपटाचा जो खालचा  टोन आहे, त्याबद्दल विचारले असता,  स्पष्ट केले की, ही  एक सत्यकथा आहे.  या हृदयस्पर्शी कथेवर आधारित चित्रपट बेतला आहे. अभिनेत्री, सुलाख्याना बरुआ हिने सामायिक  केले की, ‘राडोर पाखी’ चा भाग बनण्याचे काम तर  मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दोन्ही आव्हानात्मक होते.

चित्रपटांबद्दल:

कारखानू: ‘कारखानू’, ‘भारतीय फीचर-फिल्म’ श्रेणीमध्ये प्रदर्शित केला जात आहे.  हा चित्रपट गुजरातची पहिली ‘स्मार्ट हॉरर कॉमेडी’ म्हणून पदार्पण करत आहे. यामध्‍ये  भयंकर “हॉन्टेड फॅक्टरी” दंतकथा जिवंत केली आहे. काली चौदसच्या रात्री, तीन सुतार भुताटकीच्या कार्यशाळेत अडकले आहेत, जिथे घडणा-या विचित्र घटना त्यांना खूप उशीर होण्यापूर्वी त्याचे रहस्य उघड करण्यास भाग पाडतात. रहस्यमयता , विनोद आणि भयपट यांचे  थरारक मिश्रण असलेला हा चित्रपट अविस्मरणीय अनुभव देतो.

गुगल मॅट्रीमोनी: गुगल मॅट्रीमोनी हा चित्रपट भारतीय नॉन-फीचर फिल्म श्रेणीमध्ये प्रदर्शित केला जात आहे, अंध अनंतूच्या जीवनावर हा चित्रपट बेतला आहे. एकाकी अंध जीवन जगणारे दृष्टी आणि मदतीसाठी Google ग्लासवर अवलंबून असतात. त्याच्या अंधत्वामुळे मॅट्रिमोनी साइट्सवर नकाराचा सामना करत असताना, जेव्हा त्याच्या Google Glass ला एक स्त्री त्याच्याकडे पाहून हसणारी, प्रणयोत्सुक असलेली सापडते त्या वेळी त्याचे जग बदलते. हा चित्रपट तंत्रज्ञान-चालित जगात खऱ्या मानवी संबंधाचा शोध घेतो जिथे वास्तव आणि भ्रम अनेकदा एकमेकांत गुंफतात आणि प्रेम आणि स्वीकृती या अंतिम इच्छा राहतात.

राडोर पाखी: ‘राडोर पाखी’ ज्योतीची खरी कहाणी सांगते. आसाममधील एका महत्त्वाकांक्षी लेखिकेला ‘स्पाइनल मस्क्युलर ऍंट्रोफीचे’ निदान होते. या आजारामुळे ती अंथरुणाला खिळली गेली होती. तिच्या शारीरिक हालचालीच्या आव्हानांना न जुमानता, ती लेखक होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करत आहे. हा चित्रपट तिच्या प्रवासावर प्रकाश टाकतो, मानव गरजेनुसार ती आपल्‍यामध्‍ये किती मोठे परिवर्तन घडवून आणते, एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा  करण्यासाठी सर्व अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती दाखवते याचे चित्रण या सिनेमात केले आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading