Marathi Book Competition 2026: Akhil Bharatiya Marathi Sahitya Parishad Nashik
नाशिक जिल्हा शाखेचे आयोजन; कथासंग्रह, कवितासंग्रह, बालसाहित्यासह विविध विषयांवरील पुस्तकांना संधी
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे अंतर्गत नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने सन २०२३ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांसाठी त्रैवार्षिक पुस्तक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत कथासंग्रह, कवितासंग्रह, बालसाहित्य तसेच समीक्षा, कादंबरी, टीकात्मक आणि अन्य विविध विषयांवरील पुस्तकांना सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लेखक, कवी आणि साहित्यिकांनी आपल्या पुस्तकांच्या दोन प्रती पाठवाव्यात, असे आवाहन परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष नवनाथ अर्जुन पाटील गायकर यांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी जानेवारी २०२३ पासून ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रकाशित झालेली पुस्तके पात्र असतील. स्पर्धेसाठी चार स्वतंत्र साहित्यप्रकार निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रकारात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी १ हजार १ रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र, द्वितीय क्रमांकासाठी ७०१ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५०१ रुपये यांसह सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक साहित्यप्रकारात पाच उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व साहित्यिकांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे नवोदित तसेच अनुभवी लेखकांना आपल्या साहित्यकृती सादर करण्याची आणि साहित्यिक योगदानाला व्यासपीठ मिळवून देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
स्पर्धेसाठी पुस्तकाच्या किमान दोन प्रतींसोबत लेखकांनी स्वतःचा परिचय, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि छायाचित्र पाठविणे आवश्यक आहे. पुस्तके नाशिक जिल्हाध्यक्ष नवनाथ अर्जुन पाटील गायकर यांच्या नावे जय बजरंग हॉटेल, आहुर्ली, पोस्ट सांजेगाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक – ४२२४०३ या पत्त्यावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी ९८८१३२७७०९ आणि ९७६३८२७७०८ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
मराठी साहित्याच्या विविध प्रवाहांना प्रोत्साहन देणे आणि लेखकांच्या साहित्यकृतींना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे पात्र कालावधीत पुस्तके प्रकाशित झालेल्या साहित्यिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पुस्तके पाठविण्याची अंतिम मुदत ३१ नोव्हेंबर २०२६ अशी आहे.
व्यक्तीच्या आर्थिक निर्णयांपासून संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यापर्यंतचा प्रवास उलगडणारे संशोधनअर्थव्यवस्थेची खरी ताकद केवळ वाढत्या उत्पादनात किंवा…
गोव्यातील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) कृषी विज्ञान केंद्राने (KVK) दुभत्या गायींच्या रिपीट ब्रीडिंगच्या समस्येवर…
राजेशाही वैभवाचा वारसा, वास्तुकलेचा अनोखा आविष्कार आणि साडेतीन लाखांहून अधिक पुस्तकांचा ज्ञानखजिना जपणारे वडोदऱ्यातील सेंट्रल…
महाराष्ट्र मायभूमी, तर गुजरात कर्मभूमी; सयाजीनगरीतील साहित्य संमेलनात मराठी-गुजराती स्नेहबंधांचा गौरव वडोदरा : साहित्याने भाषिक…
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे ऐतिहासिक २०० वे संमेलन थाटात संपन्न राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद…
शिवाजी विद्यापीठात जलसंवर्धन आणि अहिंसक विकासावर विशेष व्याख्यान; पर्यावरण संवर्धनासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन कोल्हापूर :…