काय चाललयं अवतीभवती

कंधार येथे १५ नोव्हेंबरला सातवे छत्रपती शिवाजी महाराज मराठी साहित्य संमेलन

संमेलनाध्यक्षपदी आरती झोटिंग तर स्वागताध्यक्षपदी भास्कर गीते

पुणे – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ७ वे छत्रपती शिवाजी महाराज मराठी साहित्य संमेलन १५ नोव्हेंबर २०२६ रोजी नांदेड जिल्ह्यातील कंधार या ठिकाणी संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिका आरती झोटिंग तर स्वागताध्यक्षपदी साहित्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष भास्कर गीते यांची निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी दिली आहे. उद्घाटन समारंभ, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, कविसंमेलन असे संमेलनाचे स्वरूप असून मोठ्या संख्येने साहित्यिक व रसिक या संमेलनास उपस्थित राहणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी या साहित्य संमेलनाचे आयोजन दरवर्षी विविध ठिकाणी केले जाते. या अगोदरचे संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या ठिकाणी संपन्न झाले होते.

इतिहासातून प्रेरणा घेणारे संमेलन

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते, तर ते एक दूरदृष्टी असलेले लोककल्याणकारी शासक होते. रयतेचे राज्य ही त्यांची संकल्पना आजही सामाजिक समतेचा आदर्श मानली जाते. त्यांनी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन सर्व जाती-धर्माच्या मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य उभे केले. अठरापगड जातींना सोबत घेऊन, स्त्री सन्मानाचा आदर्श घालून, शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यांनी सामाजिक न्यायाची मुहूर्तमेढ रोवली. या संमेलनाच्या माध्यमातून हीच विचारधारा नव्या पिढीपर्यंत साहित्याच्या माध्यमातून पोहोचविण्याचा परिषदेचा उद्देश आहे.

कंधारचे ऐतिहासिक महत्त्व

नांदेड जिल्ह्यातील कंधार हे शहर केवळ भौगोलिक दृष्ट्याच नव्हे तर ऐतिहासिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे. कंधारचा भुईकोट किल्ला, राष्ट्रकूट काळातील इतिहास आणि मराठा कालखंडातील वीरता यामुळे या भूमीला एक वेगळे तेज आहे. अशा ऐतिहासिक भूमीत हे संमेलन होणे म्हणजे इतिहासाला साहित्याची जोड देण्यासारखे आहे.

साहित्यातून समाजप्रबोधन

शिवचरित्र हे केवळ युद्धकथांचे वर्णन नाही, तर ते व्यवस्थापन, शेती, जलनीती, परराष्ट्र धोरण आणि लोकशाही मूल्यांचे पाठ्यपुस्तक आहे. आजच्या काळात जेव्हा समाजात इतिहासाचे विकृतीकरण होत आहे, तेव्हा अस्सल शिवइतिहासावर आधारित साहित्य निर्माण होणे काळाची गरज आहे. या संमेलनात ‘शिवाजी महाराजांची सामाजिक दृष्टी आणि आजचे मराठी साहित्य’, ‘ग्रामीण साहित्य आणि शिवचरित्र’ अशा विषयांवर परिसंवाद होणार असून, नवोदित लेखकांना योग्य दिशा मिळणार आहे.

या संमेलनामुळे मराठवाड्यातील साहित्यिक चळवळीला नवी ऊर्जा मिळेल आणि शिवाजी महाराजांचा खरा, समतावादी आणि रयतेचा इतिहास घराघरात पोहोचेल, असा विश्वास डॉ. शरद गोरे यांनी व्यक्त केला.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

एकाकी मनाला शब्दांची सोबत; ‘किमया घडली शब्दांची’चा भावस्पर्शी काव्यप्रवास!

एकांताला सोबत देणारे शब्द, नात्यांना भावनेची ऊब देणाऱ्या कविता आणि सामाजिक वास्तवाला भिडणारे संवेदनशील विचार...…

45 minutes ago

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे त्रैवार्षिक पुस्तक स्पर्धा; लेखकांना सहभागाचे आवाहन

नाशिक जिल्हा शाखेचे आयोजन; कथासंग्रह, कवितासंग्रह, बालसाहित्यासह विविध विषयांवरील पुस्तकांना संधी नाशिक : अखिल भारतीय…

1 day ago

अर्थविश्वाला दिशा देणारा नोबेल; सामान्य माणसाच्या निर्णयांतून उलगडते अर्थव्यवस्थेचे गणित !

व्यक्तीच्या आर्थिक निर्णयांपासून संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यापर्यंतचा प्रवास उलगडणारे संशोधनअर्थव्यवस्थेची खरी ताकद केवळ वाढत्या उत्पादनात किंवा…

1 day ago

गायींच्या गर्भधारणेचा प्रश्न सुटणार? गोव्यात पोषण-संप्रेरक उपचारांवर भर

गोव्यातील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) कृषी विज्ञान केंद्राने (KVK) दुभत्या गायींच्या रिपीट ब्रीडिंगच्या समस्येवर…

1 day ago

बेल्जियमच्या काचेचे मजले, दुर्मीळ ग्रंथांचा खजिना! वडोदऱ्याची सेंट्रल लायब्ररी म्हणजे सयाजीराजांची ज्ञानदृष्टी

राजेशाही वैभवाचा वारसा, वास्तुकलेचा अनोखा आविष्कार आणि साडेतीन लाखांहून अधिक पुस्तकांचा ज्ञानखजिना जपणारे वडोदऱ्यातील सेंट्रल…

2 days ago

साहित्याने भाषिक अन् प्रांतवादाच्या सीमा ओलांडून माणसे जोडावीत : किशोर टिळेकर

महाराष्ट्र मायभूमी, तर गुजरात कर्मभूमी; सयाजीनगरीतील साहित्य संमेलनात मराठी-गुजराती स्नेहबंधांचा गौरव वडोदरा : साहित्याने भाषिक…

2 days ago