काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षपदी राजन लाखे यांची बिनविरोध फेरनिवड

पिंपरी: महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष प्रा. राजन लाखे यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. विशेष म्हणजे, राजन लाखे यांच्यासह १५ सदस्यांची संपूर्ण कार्यकारिणीही बिनविरोध निवडण्यात आली.

चिंचवडगाव येथील काशीधाम मंगल कार्यालयात शनिवार, २९ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे जिल्हा प्रतिनिधी डॉ.पुरुषोत्तम काळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया झाली.मसाप पुणेचे कार्यवाह सुनील महाजन हे केंद्र निरीक्षक म्हणून उपस्थित होते. जिल्हा प्रतिनिधी प्रभाकर ओव्हाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली.

अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, कोषाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य अशा एकूण १५ जागांसाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.उपाध्यक्ष आणि कार्यवाह या प्रत्येकी दोन जागांसाठी तीन-तीन अर्ज दाखल झाले होते.मात्र,निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपाध्यक्षपदाचे उमेदवार प्रा.डॉ.सुभाष आहेर आणि कार्यवाहपदाचे उमेदवार प्रा.नरहरी वाघ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.त्यामुळे अध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

या वार्षिक सर्वसाधारण सभेला १६४ सभासद उपस्थित होते.

नूतन पंचवार्षिक कार्यकारिणी
अध्यक्ष : प्रा. राजन लाखे
उपाध्यक्ष : डॉ. रजनी शेठ, मकरंद बापट
कार्यवाह : संजय जगताप, गीता सुतार
कोषाध्यक्ष : विजय नाईक

कार्यकारिणी सदस्य : किरण लाखे, दत्तू ठोकळे, डॉ. मीनल लाड, किरण जोशी, नीलिमा फाटक, इला पवार, बाळासाहेब गोरे, अशोक होनराव आणि संजय होनकळस.

सभेला संबोधित करताना मसाप पुणेचे कार्यवाह सुनील महाजन यांनी आगामी ऐतिहासिक शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नूतन कार्यकारिणी जोमाने काम करेल आणि पिंपरी-चिंचवड शाखेचा नावलौकिक आणखी वृद्धिंगत करेल, असा विश्वास व्यक्त केला.

निवडणूक प्रक्रियेनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मसाप सदस्य नितीन शास्त्री,डॉ.मीनल लाड,श्रीकृष्ण पुरंदरे,संदीप राक्षे आणि अद्वैत ऐनापुरे यांनी पिंपरी-चिंचवड शाखेने सातत्याने केलेल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्याचा गौरव केला.संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

सिंहावलोकन…! मागे वळून पाहण्यातच दडलेली पुढच्या यशाची गुरुकिल्ली

‘सिंहावलोकन…!’ यशाच्या दिशेने वाटचाल करताना केवळ पुढे जाणे महत्त्वाचे नसते, तर आपण आजवर कोणता प्रवास…

8 hours ago

‘सौंदर्याच्या कविते’चे सुंदर रसग्रहण

भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या सात्त्विक सौंदर्याने, शालीन अदाकारीने आणि कसदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री…

20 hours ago

अन्यायाविरुद्ध कायद्याची ढाल बनून उभी राहणारी रणरागिणी ॲड. परिक्रमा खोत!

बुलढाण्याच्या मातीतून सुरू झालेला प्रवास; पुण्यात स्वतःची कायदेविषयक संस्था उभी करत सामाजिक न्यायासाठी लढा ओळख:…

21 hours ago

शस्त्रास्त्रांची वाहतूक ते भूमिगत क्रांतिकारकांना आश्रय; हैदराबाद मुक्तिसंग्रामातील महिलांचा शौर्यगाथा

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील महिलांचे योगदान इतिहासाच्या पानांवर दुर्लक्षितच ! हैदराबाद मुक्तिसंग्रामातील महिलांच्या धाडसाच्या, प्रसंगावधानाच्या आणि त्यागाच्या…

1 day ago

कसाल येथे एक नोव्हेंबरला रंगणार पहिले ‘घुंगुरकाठी’ साहित्य संमेलन

अध्यक्षपदी डॉ. महेश केळुसकर, उद्घाटकपदी रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर : 50 साहित्यिकांचा सहभाग § आगळ्यावेगळया रितीने…

1 day ago

मौनाच्या गूढात दडलेले परमात्म्याचे स्वरूप

माणसाला शब्दांतून जग समजते; पण स्वतःच्या अंतरंगातील सत्याची अनुभूती मौनातून येते. मनातील विचारांचा कोलाहल शांत…

2 days ago