Rajendra Ghorpade Appointed Vice President of Marathi Sahitya Parishad Kolhapur Division
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कोल्हापूर विभागीय उपाध्यक्षपदी पत्रकार, लेखक व संपादक राजेंद्र कृष्णराव घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी पत्राद्वारे त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीमुळे कोल्हापूर विभागात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्य करण्याची नवी संधी घोरपडे यांना मिळाली आहे.
घोरपडे हे पत्रकारिता, लेखन, पुस्तक प्रकाशन आणि डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. ते ‘सकाळ’ माध्यम समूहात उपसंपादक म्हणून कार्यरत असून, यापूर्वी त्यांनी कृषी आणि अन्य सामाजिक विषयांवरील पत्रकारितेत योगदान दिले आहे. शेती, ग्रामीण जीवन, पर्यावरण, विज्ञान, सामाजिक प्रश्न आणि अध्यात्म या विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या लेखनातून संशोधनाधारित माहिती सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न दिसून येतो.
घोरपडे यांनी ‘इये मराठीचिये नगरी’ या डिजिटल माध्यमाची उभारणी केली असून, या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य, अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास आणि समकालीन विषयांवरील लेखन व वृत्तांकनाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तसेच ‘श्री अथर्व प्रकाशन’च्या माध्यमातून पुस्तक प्रकाशन क्षेत्रातही ते कार्यरत आहेत.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास आणि तिच्यातील विचार समकालीन वाचकांपर्यंत पोहोचविणे हा त्यांच्या लेखनातील महत्त्वाचा भाग आहे. इये मराठीचिये नगरी, ‘अनुभव ज्ञानेश्वरी’ आणि ‘कृषी ज्ञानेश्वरी’ यांसारख्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्म आणि शेतीविषयक विचारांची मांडणी केली आहे. ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञानाचा जीवनाशी आणि व्यवहाराशी संबंध जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
शहाजीराजे भोसले यांची स्वराज्य संकल्पना ही आंतरभारतीच्या व्यापक विचारावर आधारित होती. याच वैचारिक पायावर राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केली. शहाजीराजांच्या या संकल्पनेला विश्वभारतीची जोड देत भारतीयत्वाचा व्यापक आणि समन्वयवादी विचार मांडण्याचा प्रयत्न घोरपडे यांनी आपल्या लेखनातून करत आहेत. प्रादेशिक अस्मिता जपत संपूर्ण देशाला एका सांस्कृतिक आणि वैचारिक सूत्रात जोडणारा हा विचार आजच्या काळात अधिक महत्त्वाचा आहे. देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला परस्पर समन्वय, बंधुभाव आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या विचारांची नितांत गरज आहे,याचदृष्टीने घोरपडे यांचे प्रयत्न सुरू आहेत.
संत साहित्य, चिंतनपर ग्रंथ आणि ललित लेखनाचा गौरव; विविध गटांत सात पुस्तकांची पुरस्कारासाठी निवड पुणे…
मोठा विजय मिळविण्यासाठी नेहमीच मोठे सैन्य, अफाट साधनसंपत्ती किंवा बाह्य सामर्थ्याची गरज नसते. मनातील आत्मविश्वास,…
सेमीकंडक्टर चिप: आधुनिक जगाची अदृश्य शक्ती आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोनपासून कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिक वाहने, वैद्यकीय…
एकांताला सोबत देणारे शब्द, नात्यांना भावनेची ऊब देणाऱ्या कविता आणि सामाजिक वास्तवाला भिडणारे संवेदनशील विचार...…
संमेलनाध्यक्षपदी आरती झोटिंग तर स्वागताध्यक्षपदी भास्कर गीते पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित…
नाशिक जिल्हा शाखेचे आयोजन; कथासंग्रह, कवितासंग्रह, बालसाहित्यासह विविध विषयांवरील पुस्तकांना संधी नाशिक : अखिल भारतीय…