Western Ghats: Submit Objections to Environmental Sensitive Zone Notification by Sept 25
अंतिम अधिसूचनेवर २५ सप्टेंबरपर्यंत सूचना, हरकती नोंदविण्याची संधी; डॉ. मधुकर बाचुळकर यांचे आवाहन
कोल्हापूर : पश्चिम घाटातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राच्या अंतिम अधिसूचनेबाबत केंद्र सरकारने दिलेल्या संधीचा लाभ घेऊन नागरिकांनी आपल्या सूचना व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन वनस्पती व पर्यावरणतज्ज्ञ तथा निर्मळ अंकुरचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर यांनी केले आहे. पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी ही संधी महत्त्वाची असून, पर्यावरणप्रेमी, संशोधक, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पश्चिम घाटातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राबाबत अंतिम, सातवी अधिसूचना २७ जुलै २०२६ रोजी जारी केली आहे. या अधिसूचनेवर सूचना व हरकती नोंदविण्यासाठी २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी या मुदतीत आपली मते नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
आजअखेर पश्चिम घाट क्षेत्रातील निम्म्याहून अधिक वनक्षेत्र आणि जैवविविधता नष्ट झाली आहे. घाट क्षेत्रातील शिल्लक अवघे ३५.५० टक्के वनक्षेत्राच्या संरक्षण-संवर्धनासाठी ही अधिसूचना महत्त्वाची असल्याचे डॉ. बाचुळकर यांनी स्पष्ट केले. पश्चिम घाटातील एकूण १ लाख ६० हजार चौ.कि.मी. क्षेत्रापैकी अवघे १६ हजार ८५१ चौ.कि.मी. क्षेत्र मानवी हस्तक्षेपांपासून अवाधित ठेवण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
पश्चिम घाटातील ६४.५० टक्के भूक्षेत्र विकासासाठी खुले आहे.या क्षेत्रावर विकासासाठी कोणतीही बंधने व प्रतिबंध नाहीत. अशी वस्तुस्थिती असतानाही पश्चिम घाट क्षेत्रातील सर्व सहा राज्य सरकारांनी ३५.५० टक्के संवेदनशील क्षेत्राबाबत विरोध दर्शविला आहे. कारण त्यांना पश्चिम घाट उद्ध्वस्त करून विविध विकास प्रकल्प सुरू करून केवळ महसूल प्राप्त करायचा आहे. त्यांना तेथील पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत चिंता वाटत नाही, अशी टीका डॉ. बाचुळकर यांनी केली.
पश्चिम घाटातील जंगलांचा आजअखेर बेसुमार विनाश झाल्याने या परिसरात दरडी कोसळणे,जमिनीची अमर्याद धूप, भूस्खलन यांसारख्या दुर्घटना मोठ्या प्रमाणात होत असून, त्यातून अमर्याद नुकसान होत आहे. हे सर्व टाळण्यासाठी आपणास सर्वांनी पश्चिम घाटातील संवेदनशील क्षेत्र वाचविणे, संरक्षित ठेवणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
अधिसूचनेनुसार संवेदनशील क्षेत्रात फक्त खाणकाम प्रकल्प, लाल किंवा नारंगी श्रेणीतील विनाशकारी औद्योगिक प्रकल्प, औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, नवीन शहर निर्मिती प्रकल्प आणि मोठी बांधकामे यांना प्रतिबंध आहेत. याशिवाय इतर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. त्यामुळे अधिसूचनेमुळे तेथील नैसर्गिक अधिवासाचे, जैवविविधतेचे आणि पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या अधिसूचनेप्रमाणे पश्चिम घाटातील १६ हजार ८५१ चौ.कि.मी. संवेदनशील क्षेत्रात कोणतीही कपात करू नये. संवेदनशील गावांच्या संख्येत बदल करू नये. अधिसूचनेत कोणतीही बदल न करता अंतिम अधिसूचनेची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी डॉ. बाचुळकर यांनी केली आहे.
या मागणीसाठी पर्यावरणप्रेमी, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, शिक्षक आणि निसर्गप्रेमी नागरिकांनी ई-मेल व पत्राद्वारे सूचना व हरकती पाठवाव्यात. पत्र पाठविण्यासाठीचा पत्ता : Secretary, Ministry of Environment, Forest and Climate Change, Indira Paryavaran Bhavan, Jorbagh Road, Ali Ganj, New Delhi-110003. ई-मेल : esz-mef@nic.in.
सविस्तर माहितीसाठी संपर्क : ९७३०३९९६६८.
डॉ. मधुकर बाचुळकर, वनस्पती व पर्यावरणतज्ज्ञ, अध्यक्ष, निर्मळ अंकुर, कोल्हापूर.
अनेक ग्रंथ वाचूनही मन अस्थिर राहू शकते आणि थोडासा संतविचार मनात खोलवर रुजल्यास जीवनाकडे पाहण्याची…
नदीचा विचार केला तर तिचे पाणी नदीचे स्वतःचे नसते. पर्वतांतील झरे, पाऊस आणि असंख्य जलस्रोत…
जुनी पेन्शन योजना लागू करण्याची सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि प्राध्यापकांची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत असताना,…
अॅग्रीव्होल्टाइक्स तंत्रज्ञानातून एकाच जमिनीवर पीक उत्पादन आणि सौरवीज निर्मिती शक्य; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच हवामानातील अनिश्चिततेचा…
सोयाबीन, दुग्धव्यवसाय, कापूस आणि फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती; २३ ऑक्टोबरच्या दिल्लीतील मोर्चात…
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा गौरवशाली वारसा जपत नव्या पिढीशी साहित्याचे नाते अधिक दृढ करण्याचा…
View Comments
महाराष्ट्र सरकार ने ही जंगल तोड थांबावली पाहिजे
सह्याद्री एथेली जंगल तोडण्यासाठी माझी तीव्र विरोध आहे
आज जर जंगल तोडले तर ॲाकसीजन काय विकत आणायचा आहे
असला विकास नको
सह्याद्री मध्ये कोणत्याही कारणास्तव जसे की प्रकल्प रस्ते इत्यादी उभारण्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सरकारने सहयाद्री मध्ये असे काही करण्या आधी खोलवर विचार करायला पाहिजे
झाडे जगली पाहिजेत मशिनरी अन्न पिकवणार नाहीत तसेच ऑक्सिजन देणार नाहीत लाईट नाही आली तरी चालेल लाईट कमी पडली तरी चालेल पण झाडे जगली पाहिजेत जंगले जंगली पाहिजे अधानीचा भीमाशंकर मध्ये होणारा प्लांटला आमचा विरोध आहे सह्याद्री रांगांमध्ये असणारे जंगलांना आमचा जंगलतोडीस विरोध आहे अडाणी ग्रुप महाराष्ट्र शासनाचा आम्ही त्यांच्या धोरणाचा जंगलतोडीबाबत निषेध करत आहे
Jungle todu naka, aapla shwas band hoil
Jangal todu naka
नका करू आस माझी हात जोडून विनंती आहे सरकार चालवनाऱ्याल झाडे आहेत म्हणूनच तर आपण Sach आनी तुम्ही पण ह्या चि जान् असुद्या 🌿🦚❤️
Jangal todu naka
सरकारने आॅक्सिजन वाढावा अशा योजना आखल्या पाहिजेत. पर्यावरण वाढले पाहिजे अशी कार्य केले पाहिजे. जे नैसर्गिक झुंज सह्याद्री डोंगर रांगां जंगलांनी नटलेले आहे. प्राण वायुने भरलेले आहे , त्याला मुळीच धक्का लावु नये. हथरज चे जंगल भाजप सरकारने परवानगी देवुन तोडले, आता सह्याद्री जंगलाचा भाजप सरकारला अट्टाहास का.....? भाजप सरकारने अशा चुकीच्या योजना आनुच नये.
- एक भारतीय सुज्ञ नागरिक.
सह्याद्री पर्वत रांग वाचवलीच पाहिजे, पर्यवारणाचा ऱ्हास थांबवला पाहिजे, जंगले, नद्या, वन्यजीव, वाचले तर माणूस वाचेल.