मनोरंजन

कोल्हापूरच्या ‘गाभ’ला दोन पुरस्कार

६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात
कोल्हापूरच्या ‘गाभ’ला दोन पुरस्कार
ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट; अनुप जत्राटकर ग्रामीण प्रश्न हाताळणारे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

कोल्हापूर : कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला विषय घेऊन याच मातीत इथल्याच कलाकारांनी निर्माण केलेल्या ‘गाभ’ या चित्रपटाने ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले.

‘गाभ’ या चित्रपटाला ‘कै. दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट’ आणि चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना ‘कै. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक’ असे दोन पुरस्कार प्राप्त झाले. वरळी (मुंबई) येथे काल (दि. ५) रात्री झालेल्या दिमाखदार सोहळ्यात दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते आणि निर्माते मंगेश गोटुरे यांना प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. अभिनेते प्रसाद ओक आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

‘गाभ’ चित्रपटाला ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये अंतिम फेरीतील १० उत्कृष्ट चित्रपटांसह अंतिम फेरीतील १० उत्कृष्ट दिग्दर्शक या गटातही नामांकन मिळाले होते. त्याचप्रमाणे प्रथम पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शक या गटात अनुप जत्राटकर यांना आणि प्रथम पदार्पणातील उत्कृष्ट अभिनेत्री या गटात अभिनेत्री सायली बांदकर हिलाही नामांकन मिळाले होते. तथापि, चित्रपटाला कै. दादा कोंडके यांच्या नावे असणारा उत्कृष्ट ग्रामीण चित्रपटासाठीचा आणि कै. अनंत माने यांच्या नावे असणारा उत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शकासाठीचा, असे दोन महत्त्वाचे विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

‘कोल्हापुरी’ योगायोग

सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट पुरस्कार ज्यांच्या नावे आहे, ते प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कै. अनंत माने कोल्हापूरचे, मंचावर पुरस्कार वितरण करण्यासाठी उपस्थित प्रख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हेही कोल्हापूरचे आणि ‘गाभ’ या चित्रपटाचे निर्माते मंगेश गोटुरे हेही कोल्हापूरचे! असा त्रिवेणी संगम या पुरस्काराच्या निमित्ताने ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात जमून आला.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

‘दयवाराचे दिवस’ : मनाच्या तळाशी साठलेल्या आठवणींचा हळुवार गंध!

तळ ढवळून निसर्गाच्या कुशीत दवबिंदू होऊन विसावलेलं ‘दयवार’ म्हणजे केवळ धुकं नव्हे, तर बालपणीच्या आठवणी,…

5 hours ago

राजेशाही थाट, दूरदृष्टी अन् लोककल्याणाचा ध्यास ! राजर्षी शाहू महाराजांच्या आठवणींना उजाळा

अंगावर राजेशाही पोशाख, गळ्यात अलंकारांची माळ, हातात तलवार आणि चेहऱ्यावर करारी व्यक्तिमत्त्वाची छाप… हे केवळ…

17 hours ago

मुलींच्या शिक्षणासाठी कायदा, शिष्यवृत्ती अन् संघर्ष! शाहू महाराजांची क्रांतिकारी दूरदृष्टी

स्त्रीला शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवून समाजात समानतेचा अधिकार मिळवून देणे, ही राजर्षी शाहू महाराजांच्या समाजसुधारणेची…

17 hours ago

संसाराला तिलांजली देणारे विश्वरूप माधवाचे दर्शन !

तीर्थक्षेत्री स्नान करून शरीर शुद्ध होते; पण सद्भाव, भक्ती आणि आत्मज्ञानाच्या संगमात डुबकी घेतली की…

1 day ago

विज्ञानाच्या आधारावर सत्याचा शोध घेणारी दुर्गा!- प्राजक्ता खैरनार

गुन्ह्याच्या घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांना विज्ञानाची जोड देत सत्याचा शोध घेणे आणि निर्दोष व्यक्तीला न्याय मिळवून…

2 days ago

महिलांच्या न्यायासाठी पेटली संघर्षाची मशाल; सत्यभामा सौंदरमल यांची धगधगती कहाणी

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..१० अन्यायाची झळ स्वतः सोसली, पोलिस कोठडीचा धाक अनुभवला; पण त्या…

2 days ago