November 22, 2024
Return rains are currently in place while Maharashtra is likely to be partly cloudy from tomorrow
Home » परतीचा पाऊस  सध्या जागेवरच तर महाराष्ट्रात उद्यापासून काहीसा उघडीपीकडे कल
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

परतीचा पाऊस  सध्या जागेवरच तर महाराष्ट्रात उद्यापासून काहीसा उघडीपीकडे कल

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे, मोबाईल – 9423217495

परतीचा पाऊस  सध्या जागेवरच तर महाराष्ट्रात उद्यापासून काहीसा उघडीपीकडे कल

१-पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

उद्या शनिवार ( दि. २८ सप्टेंबरपासून ) आठवडाभर म्हणजे शनिवार ( दि. ५ ऑक्टोबर) पर्यन्त खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर व मराठवाड्यात अश्या १८ जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहून हळूहळू पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. केवळ अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असु शकते. मुंबईसह कोकण व विदर्भातील १८ जिल्ह्यात मात्र अश्या प्रकारची उघडीपीची परिस्थिती ही १ ते ५ ऑक्टोबर दरम्यानच्या पाच दिवसात जाणवू शकते असे वाटते.

२-पुर परिस्थितीची तीव्रता वाढण्याची शक्यता.

येत्या तीन दिवसात  कोकणातील मुंबई शहर व उपनगर, ठाणे व उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अश्या ७ जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अश्या ६ जिल्ह्यात अश्या एकूण १३ जिल्ह्यातील तापी, गोदावरी व कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात मात्र पूरपाण्याची तीव्रता वाढू शकते, असे वाटते.

३. ऑक्टोबरमधील पाऊस

सहा ऑक्टोबर नंतर पुन्हा पावसाची सक्रियता वाढून १३ ऑक्टोबर पर्यन्त म्हणजे आठवडाभर महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

४.मान्सूनचे निर्गमन

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजे १६ ऑक्टोबर नंतर मान्सून केंव्हाही निरोप घेऊ शकतो. अर्थात मान्सून निघून गेला तरी चक्रीवादळाचा सीझन चालु होत असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याअखेर दरम्यानही महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाकारता येत नाही.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading