November 8, 2025
सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवीकट्ट्यासाठी कविता पाठवण्याचे आवाहन. प्रमुख: कवी राजन लाखे. अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२५.
Home » सातारा येथील मराठी साहित्य संमेलनातील कविकट्ट्यासाठी कविता पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

सातारा येथील मराठी साहित्य संमेलनातील कविकट्ट्यासाठी कविता पाठविण्याचे आवाहन

पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष, लेखक कवी राजन लाखे यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणाऱ्या कवीकट्ट्याच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. सातारा येथे १, २, ३, ४ जानेवारी २०२६ रोजी हे मराठी साहित्य संमेलन होत आहे.

८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून राजन लाखे हे कविकट्टाचे संयोजन करत आहेत. दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या साहित्य संमेलनातही त्यांनी ही जबाबदारी सांभाळून कविकट्टा यशस्वी केलेला होता. यावेळीही साहित्य महामंडळाने त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीचा विचार करून त्यांना अखिल भारतीय कवीकट्ट्याची जबाबदारी बहाल केली आहे.

पिंपरी येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविकट्टा व्यासपीठावर १०२४ कवींना, कविता सादरीकरणाची संधी मिळवून देऊन साहित्य क्षेत्रात त्यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे. लाखे हे महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे तथा अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणेचे अध्यक्ष असून कविता, ललित, संपादकीय, तसेच बालसाहित्य विभागात त्यांची ९ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा “बकुळगंध” हा शान्ता शेळके जन्मशताब्दी ग्रंथ, मराठी साहित्य विश्वात नाविन्यपूर्ण ग्रंथ ठरला असून या ग्रंथाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झाली आहे.

सातारा येथे होणाऱ्या कवीकट्ट्याची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र तसेच परदेशातून कविता येण्यास सुरुवात झाली आहे. अखिल भारतीय कविकट्टा निवेदनाच्या अधीन असलेल्या अटीनुसार कविता पाठवण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२५ आहे असे सातारा कवीकट्टा नियोजन समितीने कळवले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क – राजन लाखे 9637278451


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

1 review

Anant Bhimrao Sarate November 5, 2025 at 7:37 PM
Marathi poem purala

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading