झाडे सारे काही विसरतात
आणि
झाडावर चरून गेलेले पक्षी..?
सावलीला कधीकाळी बसलेले पांथस्थ…?
विसरून जातात
झाडांना…!
अशावेळी झाडांनी तक्रार तरी
कुणाकडे मांडावी ?
मग स्वतःचे अस्तित्व असेपर्यत
झाडे आपआपसात
कुजबुजतात.
देवस्की करतात
ढोल बडावतात..
प्रार्थना म्हणतात..
गा-हाणीही घालतात…
‘देव’ही कुदवतात.. झाडे.
त्यांचे कुणीच ऐकत नाही
तेव्हा मात्र
झाडे…मिसळून जातात
मातीत.
पण पाऊस पडून गेल्यावर
पुन्हा अंकुरतात झाडे
कृतघ्न मतलबी दुनयेसाठी.
झाडे निःष्पापपणे
पुन्हा
वाढतात. .
त्यांना दिवसागणिक पालवी फुटते, मग… पुन्हा
फुलतात..फळतात झाडे.
नि
पुन्हा तोच नवा नियतीचा डाव
खेळतात. झाडे.
अगदी अव्याहतपणे…
निरंतर ..अखंड .
कवी – बाळकृष्ण लळीत
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.