अनेकांची ही तक्रार असते की अभ्यास करताना त्यामध्ये लक्ष लागत नाही. मन इकडे तिकडे धावते. एकाग्रता साधत नाही. अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही. यावर काय करायचे याचे उत्तर सर्वांनाच हवे आहे. तर मग पाहूया अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याच्या टिप्स…
जयवंत बोंगे – पाटील, सोहम अकादमी
एकाग्रता म्हणजे काय ? हे प्रथम विचारात घ्यायला हवे. हा एक मानसिक उपाय आहे. यामध्ये एकाच गोष्टीवर एकाचवेळी लक्ष केंद्रित केले जाते. पण हे अभ्यास करताना हे शक्य होते काय ?
एकाग्रता का होत नाही याची अनेक कारणे आहेत. हॉवर्ड विद्यापीठाने यावर एक संशोधन केले आहे. यामध्ये त्यांना असे आढळले की 47 टक्के लोक हे दिवसासुद्धा स्वप्नामध्ये असतात. स्वतःच्या विचारात गुरफटलेले असतात. त्यामुळे मन एकाग्र करण्यात त्यांना अडचणी येतात. त्यांच्या स्वप्नामधील 90 टक्के विचार हे जुने असतात. या कारणामुळे त्यांना नव्या गोष्टी आत्मसात करण्यास वेळ लागतो. सर्वसामान्य माणसाच्या मनात दिवसभरात 50 ते 70 हजार विचार येतात. यामध्ये येणार हे विचार जुने बुरसट विचार असतील तर नव्या विचारावर त्याचे लक्ष केंद्रित होणार नाही.
एकाग्रता मिळवण्याची पहीली टिप…
- स्वतःला प्रथम हे जाणून घ्यायचे आहे की मन, शरीर आणि ह़द्य यांना प्रथम जाणून घ्यायला हवे.
- कोणतेही काम करताना आपण कसे बसलो आहोत. शरीराची स्थिती कशी आहे हे विचारात घ्यायला हवे. कारण ताठ बसलेले असाल तर आपण सावधान असतो. म्हणजे यासाठी आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला हवे
- कोणती गोष्ट करत आहात ती मनापासून, ह़द्यापासून करत आहात का ?
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.