March 19, 2024
Clitoria ternatea Gokarn Medicinal Plant
Home » गोकर्ण (ओळख औषधी वनस्पतीची)
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गोकर्ण (ओळख औषधी वनस्पतीची)

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये  गोकर्ण या वनस्पतीबद्दल माहिती…

– सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल – 9850139011,9834884804

वनस्पतीचे नाव- सुपली (गोकर्ण)

वनस्पतीचे वर्णन-

उष्ण प्रदेशात सर्वत्र आढळणारी शिमबावत वेल. ही वनस्पती फाबेसी कुळातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लीटोरिया टर्नेटीया आहे. हि वनस्पती मुळची आशियाच्या उष्ण प्रदेशातील असून नंतर तिचा प्रसार आफ्रिका व ऑस्ट्रेलिया खंडात झाला. भारतात हि वनस्पती सर्वत्र आढळत असून बऱ्याचदा कुंपणावर वाढलेली व बागेत शोभेकरिता लावलेली दिसते.

गोकर्ण या बहुवर्षायु वेलीचे खोड आणि फांद्या वळणदार असतात. पाने संयुक्त व पिसासारखे असून पर्णिक ५ ते ७ व लंब वर्तुळाकार असतात. फुले निळी किंवा पांढरी एकेकटी व पानांच्या बगलेत जून ते जानेवारी महिन्यात येतात. शेंगा गवारीप्रमाणे चपट्या असून त्यांचे टोक चोचीसारखे असते. बिया ५ ते १० मऊ व पिवळसर करड्या असतात. फुले गाईच्या कानासारखी असल्याने गोकर्णी नाव पडले आहे. गोकर्णाची लागवड बियांपासून केली जाते. शेंगा पक्व झाल्या की त्या तडकतात. त्यातून साधारण ८ ते १० बिया मिळतात. याच बिया रुजवून गोकर्णाची नवीन रोपे तयार करता येतात. पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही मातीत या बिया सहज रुजतात. घराची गलरी, कमान, शाळेच्या गेटची कमान, मंदिराचे प्रवेशद्वार अगदी कुठेही गोकर्णाच्या वेलीची लागवड करून तो परिसर सुशोभित करता येतो.

उपयोग

गोकर्णाची फुले, शेंगा, पाने, साल, मुळ्या या प्रत्येक भागाचा औषधामध्ये वापर केला जातो.

  1. सर्दी, खोकला, ताप, दमा या सगळ्या विकारांवर गोकर्ण औषधी आहे. तसेच त्वचाविकार आणि रक्तशुद्धीसाठी देखील वापर केला जातो.
  2. पानांचा रस आल्याच्या रसासोबत दिल्यास घाम कमी येतो. जाडी माणसे आणि मधुमेह असणाऱ्यांना जास्त घाम येतो त्यांना उपयुक्त.
  3. साप चावल्यावर विष बाहेर काढण्यासाठी शरीरातून चावलेल्या जागेवर गोकर्णाचा औषधी म्हणून उपयोग करतात.
  4. शेंगाच्या रसाचे थेंब जर रोज नाकात घातले तर अर्धडोकेदुखी पासून मुक्ती मिळते. थेंब टाकल्यास कानदुखीपासुन आराम मिळतो.
  5. गोकर्णाचा उपयोग शरीर शुद्धीसाठी केला जातो. शरीरात अनेक दिवसापासून जमा झालेले विष बाहेर टाकून शरीरशुद्धी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
  6. मेंदू रोग संबंधित जवळजवळ सर्वच आजारांवर याचा उपयोग होते. जसे विसराळूपणा, वाचलेले न आठवणे, मुलांच्या समस्येवर याचा उपयोग होतो.
  7. आवाजासंबंधित स्वरयंत्र, गळ्याचे आजार बरे करण्यासाठी लाभकारी
  8. झाडाच्या मुळीची पावडर तुपात मिश्र करून घेतल्यास घसा दुखीपासून आराम मिळतो.
  9. गोकर्णी मुळीचा लेप करून त्वचेवर लावल्यास चमक वाढते.
  10. डोळ्यांसाठी थंड असून डोक्याची कार्यक्षमता वाढीसाठी फायदेशीर आहे.
  11. शरीराला आलेली सूज, मुका मार यावर झाडाची पेस्ट करून लावल्यावर बरे होते.
  12. अपचन समस्या कमी करून आतड्यांची ताकद वाढविते. ज्यामुळे पोट साफ होते.
  13. गोकर्णीच्या पानांचा काढा करून पिल्यास ताप, जुलाब, मळमळ सारख्या आजारांवर औषधी उपचार म्हणून फायदा होतो.
  14. गोकर्णीची पाने चहामध्ये टाकून पिल्यास हृद्यरोग व श्वसनासंबंधी आजार कमी करता येतात.
  15. गोकर्णीची फुले पुरुषांमधील स्पर्म वाढवितात. झाडाची पावडर मधासोबत रोज घेतल्यास पुरुषांची लैगिक शक्ती वाढते.
  16. ह्याच्या रसाचे नेहमी सेवन केल्याने रक्त शुद्ध होवून त्वचेवरील फोड, पुरळ, कमी करता येतात.
  17. निळ्या गोकर्णाच्या फुलाचा रंग देखील करतात.
  18. गोकर्णाच्या फुलाचा चहा अत्यंत औषधी असून तो मध किंवा गुळ घालून घेतात.

Related posts

सिंगोनियमची लागवड…

नवतेज सरना यांना  यंदाचा ‘सरहद’चा‘संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार’

अपेक्षा न ठेवता कर्म केल्यास निश्चितच यश

1 comment

Harshada December 1, 2022 at 9:16 PM

Mast

Reply

Leave a Comment