अस्तीनितले साप… वासुदेव महादेवराव खोपडे यांची कविता…
नका पाजू दूध आज
अस्तिनीतिल्या सापांना
वेचुन ठेचुन मारा
देशी काळ्या फिरंग्यांना ।।
भ्रष्टाचारी दुराचारी
शोधा ह्या देशद्रोहयांना
कुठवर माफ कराल
बेईमान घर भेदयांना ।।
सत्तेसाठी पैशासाठी
विकती त्यांचे ईमान
पाटाखालचे साप हे
दूधा आईच्या बेईमान ।।
मायभूच्या मुक्तीसाठी
पाट वाहिले रक्ताचे
त्या पाटात घोडे न्हाले
स्वार्थी सापांच्या स्वार्थाचे ।।
तक्षक झाले भक्षक
लपविती त्यांचे बाप
ह्या बापांसव ठेचारे
देशी काळे गोरे साप ।।
नक्षली, आतंकी, बोडो
फुत्कारती दंशती साप
मातृभूमीला मुक्त करा
अग्नित स्वाहा करा साप ।।
दूध पाजाल कितीही
जहर ओकती साप
देशास विनाशकारी
हे अस्तीनितले सांप ।।
वासुदेव महादेवराव खोपडे,
सहा पोलीस उपनिरीक्षक ( सेनी ),
अकोला मोबाईल – 9923488556
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.