गुळवेलचे शास्त्रीय नाव – Tinospora Cordifolia
गुळवेल किंवा गुडूची हृदयाच्या आकाराची पाने म्हणून कॉर्डिफोलिया हे नाव पडले.
भारत, श्रीलंका, म्यानमार अशा उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळणारी गुळवेल ही एक वेल आहे. हिला अमृतवेल म्हणतात. गुळवेलला हिंदी भाषेत गिलोय म्हणूनही ओळखले जाते. या वनस्पतीचे सत्त्व औषध म्हणून वापरतात. त्याला गुळवेलसत्त्व असे नाव आहे.
गुळवेलाचे औषधी उपयोग
कॅन्सर, ज्वर(ताप), त्रिदोषविकार, त्वचा रोग, नेत्र विकार, पंडुरोग, प्रमेह, मधुमेह, मूत्रविकार, यकृत विकार, रक्तशर्कराविकार, वमनविकार, संग्रहणी, सर्दी पडसे, हृदयविकार आदी विकारांवर गुळवेल हे एक उपयुक्त औषध आहे.
या वनस्पतीच्या कंदाचा आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. या वनस्पतीची पानेही औषधी आहेत. गुळवेलीमध्ये टिनोस्पोरिन, टिनोस्पोरिन आम्ल, टिनोस्पोरिन गिलोइन, गिलोनिन ही रासायनिक गुणद्रव्ये आहेत. ही रसायने चवीला कडू असतात. तो कडवटपणा गुळवेलीच्या पानांत आला आहे.
गुळवेलीचे खोड चवीला कडू, तुरट आणि किंचित गोड असते. गुळवेलीच्या अनोख्या गुणांमुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये या वनस्पतीचा उपयोग करतात. अशक्तपणा, कावीळ, कृमींचा त्रास, जुलाब, पोटातील मुरडा, मधुमेह, मूळव्याध, संधिवात, हगवण अशा निरनिराळ्या व्याधींमध्ये गुळवेलीचा उपयोग होतो. त्यामुळे गुळवेल ही वनस्पती आयुर्वेदात ‘अमृतकुंभ’ म्हणून ओळखली जाते. वाढत्या उकाड्यामध्ये गुळवेलीच्या पानांची भाजी आरोग्यदायी ठरते. मेथीच्या भाजीप्रमाणे भाजी केली जाते. भाजीपासून केलेले पराठेही चवदार लागतात.
गुळवेलीतील पोषक घटकांमुळे शरीरातील रक्त पेशींची संख्या वाढण्यास मदत मिळते.
डॉ. मानसी पाटील
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.