‘ थंडीची लाट ओसरली!’ ‘ तरीही माफक थंडी जाणवणारच!’
‘ पावसाची शक्यता मात्र नाही!’माणिकराव खुळे
येत्या पाच दिवसामधील (१९ ते २४ डिसेंबर) माफक थंडी व तापमाने
आज पासून पुढील पाच म्हणजे मंगळवार दि.२४ डिसेंबर पर्यन्त महाराष्ट्रात थंडीची लाट ओसरून माफक थंडीची शक्यता जाणवते. भागपरत्वे तापमाने अशी राहतील –
मुंबईसह कोकण – किमान १५ ते २० तर कमाल ३१ ते ३४ डिग्री से. ग्रेड,
खान्देश सह मध्यमहाराष्ट्र – किमान तापमान हे ७ ते १४ तर कमाल तापमान २६ ते ३१ डिग्री से. ग्रेड
मराठवाडा – किमान तापमान हे ९ ते ११ तर कमाल तापमान २९ ते ३० डिग्री से. ग्रेड
विदर्भ – किमान तापमान हे ९ ते १३ तर कमाल तापमान २८ ते ३२ डिग्री से. ग्रेड
त्यानंतरच्या पुढील पाच (२५ ते २९ डिसेंबर) तापमानात अजुन वाढ होवून ऊबदारपणा जाणवेल. त्या दिवसातील तापमाने –
मुंबईसह कोकण – किमान १७ ते २० तर कमाल ३२ ते ३४ डिग्री से. ग्रेड,
खान्देश सह मध्यमहाराष्ट्र -किमान तापमान हे ९ ते १५ तर कमाल तापमान २८ ते ३२ डिग्री से. ग्रेड
मराठवाडा – किमान तापमान हे १० ते १२ तर कमाल तापमान ३० ते ३२ डिग्री से. ग्रेड
विदर्भ -किमान तापमान हे ११ ते १५ तर कमाल तापमान ३० ते ३३ डिग्री से. ग्रे
त्यामुळे दरवर्षी नाताळ सणाला जाणवणारी तीव्र थंडी ह्यावर्षी जाणवणार नाही, असे वाटते.
पुन्हा वर्षअखेर व नववर्षातील ३० डिसेंबर पासून थंडीत वाढ होण्याची शक्यता असुन तापमाने अशी असतील –
मुंबईसह कोकण – किमान १२ ते १७ तर कमाल २६ ते ३० डिग्री से. ग्रेड,
खान्देश सह मध्यमहाराष्ट्र -किमान तापमान हे ५ ते १२ तर कमाल तापमान २६ ते ३१ डिग्री से. ग्रेड
मराठवाडा – किमान तापमान हे ८ ते ११ तर कमाल तापमान २८ ते ३० डिग्री से. ग्रेड
विदर्भ -किमान तापमान हे ८ ते १२ तर कमाल तापमान २७ ते ३० डिग्री से. ग्रे
वर्षाअखेरीस म्हणजे रविवार दि. २९ डिसेंबर पासून हळूहळू थंडीत वाढ होवुन नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची अपेक्षा करू या! येत्या नजीकच्या काळात कोणत्याही वातावरणीय घडामोडीतून महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवत नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.