March 29, 2024
Womens day special article by Pushpatai Varkhedkar
Home » स्त्री जन्मा तुझी कहाणी! हृदयी अमृत नयनी पाणी!
मुक्त संवाद

स्त्री जन्मा तुझी कहाणी! हृदयी अमृत नयनी पाणी!

मनुस्मृतीने म्हटले आहे की दहा उपाध्याय पेक्षा एक आचार्य श्रेष्ठ शंभर आचार्यापेक्षा एक पिता श्रेष्ठ आणि हजार पित्या पेक्षा एक माता श्रेष्ठ असते. असे म्हटले आहे; समतेचा आणि स्वातंत्र्याच्या विचाराचा नकारात्मक अर्थ घेण्याऐवजी विधायक अर्थ घेतला तर स्त्री-पुरुषाचे जीवन अधिक सुंदर व प्रगल्भ बनेल.

सौ पुष्पाताई सुनिलराव वरखेडकर
पर्यवेक्षिका पी. डी .कंन्या शाळा वरूड

स्त्री जन्मा तुझी कहाणी!
हृदयी अमृत नयनी पाणी! 👧

प्रेम, दया, माया करुणा वात्सल्य दूरदृष्टी कोण सोशिकता या सर्व गुणांचा समुच्चय म्हणजे नारीशक्ती:. स्त्री,नारी,आई बहीण सहचारिणी या सर्व भूमिका निभविणारी स्त्री.

आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने स्त्रीशक्ती सन्मानाचा व गतकालीन ते आजच्या काळापर्यंतचा प्रवास कसा ठरला हे नमूद करावेसे वाटते. धर्मशास्त्रांनी घालून दिलेल्या चाकोरीमुळे स्त्रियांचे जीवन संकुचित झाले होते व स्त्री स्वातंत्र्याला पात्र असे विचार मनुस्मृती ; याज्ञवल्क्य स्मृती धर्मग्रंथांनी मांडले आहे. बहुसंख्य धर्मशास्त्रांनी स्त्रियांची निंदा केली असली तरी काही धर्मशास्त्रे काही बाबतीत स्त्रियांची बाजू घेत असल्याचे दिसून येते; परंतु धर्मशास्त्रांनी देखील स्त्रियांच्या बाबतीत व त्यांच्या बाजूने विचार केलेला दिसतो ; विधी निर्माता जरी परमेश्वर पुरुषाच्या स्वरूपात मानला जातो परंतु या धरणीला अर्धनारी नटेश्वराच्या संकल्पनेने मोठा धक्का दिला आहे; अर्धरुप नारीचे अर्धरूप पुरूषांचे असे संयुक्त स्वरूपात हा नटराज आहे. हे विसरता कामा नये; वास्तविक शंकर आणि पार्वती या देवता अनार्याच्या होत्या त्यातील काही जमाती मातृप्रधान होत्या;

शतपथ ब्राह्मणात म्हटले आहे की, पत्नी म्हणजे पुरुषाचा अर्धा भाग म्हणूनच जोपर्यंत तो पत्नी स्वीकारत नाही तोपर्यंत तो पुत्र प्राप्ती करू शकत नाही आणि तोपर्यंत तो अपूर्णच असतो. महाभारतातही भार्या ही पुरुषाचा अर्धा भाग आहे. सर्वश्रेष्ठ मित्र आणि धर्म, अर्थ, काम या पुरुषारथाचे मूळ म्हणजे स्त्री असल्याचे म्हटले जाते इतर स्वरूपातील स्त्रीची नाना प्रकारे निंदा केली जात असताना. मातू स्वरूपातील स्त्रीचा मात्र सर्वांनी मुक्तकंठाने गौरव केला आहे. धर्मग्रंथ, गुरु माता श्रेष्ठ म्हणतात.

मनुस्मृतीने म्हटले आहे की दहा उपाध्याय पेक्षा एक आचार्य श्रेष्ठ शंभर आचार्यापेक्षा एक पिता श्रेष्ठ आणि हजार पित्या पेक्षा एक माता श्रेष्ठ असते. असे म्हटले आहे; समतेचा आणि स्वातंत्र्याच्या विचाराचा नकारात्मक अर्थ घेण्याऐवजी विधायक अर्थ घेतला तर स्त्री-पुरुषाचे जीवन अधिक सुंदर व प्रगल्भ बनेल. भारतीय समाजाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर पुरुषाच्या मानसिकतेत परिवर्तनाची गरज आहे. तसेच स्त्रियांचा देखील यामध्ये सहभाग आहे स्त्रियांनी सुद्धा मुलीप्रमाणे दृष्टिकोन ठेवला पाहिजे. समाजातील कोणतीही स्त्री, सून हिचा सन्मान करायला हवा. मानवीय दृष्टिकोन, मानवतावादी विचारसरणी निर्माण करण्याची गरज आहे. स्त्रियांची प्रतिभा जितकी फुलेल त्यांच्या अंतशक्ती जितक्या साकार होईल . स्त्रियांची कार्यक्षमता व सर्जनशीलता मारून टाकणे म्हणजे एकूणच मानव जातीचे नुकसान आहे. ते मानव जातीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. अशी समाज व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. जिथे मानवी जीवनात परस्पर विश्वाचे वातावरण राहील आनंदाने जीवन बहरून जाईल. तर असं म्हणावं लागेल;

तिने अनेक भूमिका वठविल्या आहे , तपस्विनी, योगिनी, कलेची अधिष्ठात्री, संगोपन, संरक्षण, कुटुंब कल्याण समावेशकता धैर्याला तोंड देणारी, समस्यांना सामोरे जाणे, कुटुंब व्यवस्थापन अशा अनेक भूमिका तिने व वठविल्या आहेत. कुठे कुठे आजही पुढील समस्यांना तिला सामोरे जावे लागते. स्त्री ही आजही पुरुषाची स्वामिनी आहे. स्त्रीला कुटुंबामध्ये दुय्यम स्थान आहे. तसेच स्त्री एक उपभोग्य वस्तू आहे, असे समजले जाते.

काही दुर्गम भागामध्ये बालविवाहाची प्रथा आजही प्रचलित आहे.अप्रत्यक्षरीत्या हुंडा पद्धती देखील पाहायला मिळते. स्त्रियांनी सक्षम बनण्याकरिता समाधी स्तरावर सहभागी होणे, राजकीय स्तरावर सहभागी होणे, स्वतःला स्वतःची जाणीव असणे ,समाजामध्ये रूढी आणि परंपरा आहेत त्यांना व स्वतःची क्षमता ओळखून स्वतःला ओळखायचे. स्वतः शिक्षण घेऊन रोजगार प्राप्त करावा स्त्रियांच्या उद्धाराकरिता स्त्रियांच्या उत्थाना करिता सभा, संमेलने, चर्चा, परिषदा घेऊन सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची गरज आहे .

आज रोजचा पेपर उघडल्यावर निराशा जनक बातम्या ऐकायला मिळतात. बलात्कार घटस्फोट अत्याचार जुलूम या सर्व गोष्टींना जर लढा द्यावयाचा असेल, तर असे म्हणावे लागेल

खांद्यावरती घेऊन अर्धे आकाश चला जाऊया पुढे ,
नवशतकाच्या पाठीवर लिहू समानतेचे धडे

स्त्री-पुरुष समानतेतील तफावत बरीच कमी झालेली दिसते. स्त्री-पुरुषांना समान संधी सर्व क्षेत्रांमध्ये दिसून येते. पुरुषांच्या बरोबर आर्थिक मोबदला सुद्धा मिळते. समाजात दोन्ही घटक आहे, पुरुषाचा सहभाग असणे आवश्यक आहे पुरुषांनीही मदत केली तर स्त्री विकासाचे काम सोपे जाईल. विकास करण्याची समान संधी द्यावी. स्त्रियांना सन्मानाने वागवावे आणि या सर्वांचा एक वेगळा परिणाम दिसून येईल .

स्त्रीने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावे .कुटुंबातील बाकीच्या घटकाकडे जास्त लक्ष देऊन स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते म्हणून स्त्री सक्षम बनण्याकरता तिचे आरोग्य देखील आवश्यक आहे. शासन, समाज ,कुटुंब ,देश आज जागृत झालेला आहे.

स्त्रीच्या सबलीकरणासाठी प्रगतीसाठी सामाजिक स्तरावर कार्य करत आहे. आज स्त्री मुक्त झालेली आहे .स्वतःचा विकास करण्याकरता शिक्षण, व्यवसाय, कला, तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांमध्ये ती अग्रेसर आहे. पुन्हा आजच्या स्त्रीबद्दल वर्णन करायचे म्हणजे
खांद्यावरती घेऊन अर्धे आकाश!
चला जाऊया पुढे!
नवशतकाच्या पाठीवर लिहू
समानतेचे धडे!

हा सर्व विकास साधताना देखील तिने आपल्याला दिलेल्या नैसर्गिक भावभावनांचा समतोल साधून
“हृदयी अमृत नयनी” पाणी हा निसर्गाचा समतोल तिने राखला आहे. कारण जन्मतःच निसर्गाने तिला काही उत्तरदायित्व दिले आहे. या सहज स्वभावामुळे ती निसर्गाचा समतोल राखते.

Related posts

वाटाड्या अन् रक्षक सदगुरु…

वेलवर्गीय भाजीपाला – पीक सल्ला

कोरोनामुक्तीत अध्यात्माचे महत्त्व…

Leave a Comment