कोल्हापूर – ‘गावडे घरकुल’ प्रेरित आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथील ‘गंगाचंद्र’ साहित्य, कला, सेवा मंचच्यावतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती मंचच्या सचिव वैष्णवी दत्तात्रय पाटील व अध्यक्ष दत्तात्रय हरी पाटील यांनी दिली आहे.
राज्यभरातून आलेल्या काव्यसंग्रहातून निवड समितीने चार कविता संग्रहांची निवड केली आहे. यामध्ये श्रीहरी काव्य पुरस्कार २०२५ ‘काळच उत्तर देईल’ या डॉ. श्रीकांत पाटील ( घुणकी, कोल्हापूर ) काव्यसंग्रहास, तर जिजाई काव्य पुरस्कार २०२५ ‘मौनातील चाफा’ या रेखा दीक्षित (आशारेखा) यांच्या काव्यसंग्रहास जाहीर केला आहे.
सुवर्णसाक्षी काव्य पुरस्कार २०२५ भारती पाटील ( कामेरी – सांगली ) यांच्या ‘आदिम दुःखाचे वर्तूळ’ या काव्यसंग्रहास तर गंगाचंद्र विशेष काव्य पुरस्कार २०२५ स्नेहल पंडित ( आजरा, कोल्हापूर ) यांच्या ‘शब्द माझे सोबती’ या काव्यसंग्रहास जाहीर केला आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
