काय चाललयं अवतीभवती

‘गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ नाटक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

झाडीपट्टीच्या रंगभूमीवर गाजलेली क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांची शौर्यगाथा आता विद्यापीठाच्या वर्गखोलीत पोहोचणार आहे. नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ या नाटकातील नाट्यांशाचा गोंडवाना विद्यापीठाच्या बी.ए. तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे २५व्या वर्षी गोंडवानाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या या आद्य क्रांतिकारकाचा इतिहास नव्या पिढीसमोर अभ्यासाच्या माध्यमातून येणार आहे.

गडचिरोली : विदर्भातील प्रसिद्ध नाटककार आणि महाराष्ट्र शासन पुरस्कृत साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ या गाजलेल्या नाटकातील नाट्यांशाचा गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. बी.ए. तृतीय वर्षाच्या ‘गोंडवाना भाषावैभव – भाग ३’, सत्र ५ या विषयाच्या अभ्यासक्रमात नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत नाटकाच्या अंक ३, प्रवेश ६ मधील नाट्यांशाचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील साहित्यिक, सांस्कृतिक आणि नाट्य क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.

गोंडवानाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी शहीद झालेल्या चांदागडच्या सुपुत्राची आणि आदिवासी गोंडराजाची शौर्यगाथा या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. गोंडवाना विद्यापीठाने या नाटकाची अभ्यासक्रमासाठी निवड केल्यामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांच्या इतिहासाचा आणि त्यांच्या संघर्षाचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या आद्य क्रांतिकारकाच्या इतिहासाला नव्याने उजाळा मिळण्यास मदत होईल, अशी भावना जाणकारांनी व्यक्त केली आहे.

चुडाराम बल्हारपुरे लिखित हे नाटक केवळ झाडीपट्टीच्या रंगभूमीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले आहे. अनिरुद्ध वनकर यांच्या दिग्दर्शनाखाली शासन स्तरावर या नाटकाचे अनेक प्रयोग सादर करण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागातर्फेही विभागीय स्तरावरील नाट्यस्पर्धांमध्ये या नाटकाचे प्रयोग सादर करण्यात आले आहेत.

या नाटकाला विविध संस्थांकडून राज्यस्तरीय दहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नाटकाची रंगभूमीवरील लोकप्रियता, ऐतिहासिक आशय आणि क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांच्या शौर्यगाथेचे प्रभावी चित्रण यामुळे त्याला व्यापक मान्यता मिळाली आहे.

‘गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ या नाटकातील नाट्यांशाचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश केल्याबद्दल चुडाराम बल्हारपुरे यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे आभार मानले आहेत.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

गीता केवळ ग्रंथ नव्हे, साक्षात परमात्म्याच्या ज्ञानवाणीचा दिव्य आविष्कार!

ज्या परमेश्वराचे स्वरूप वेदांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तोच परमात्मा श्रीकृष्ण भगवद्गीतेचा वक्ता आहे. त्यामुळे…

5 hours ago

बाल वाचकांसाठी दिवाळीची खास मेजवानी : जंगलातील दिवाळी

दिवाळी म्हटले की डोळ्यांसमोर येतात पणत्यांची रोषणाई, आकाशकंदील आणि फटाक्यांची आतषबाजी! पण जंगलात दिवाळी साजरी…

8 hours ago

बृहदेश्वर मंदिर : चोल साम्राज्याचे स्थापत्यवैभव अन् मराठ्यांच्या इतिहासाचा अमिट ठसा !

दगडांमध्ये कोरलेला इतिहास, स्थापत्यकलेचा अद्भुत आविष्कार आणि चोल व मराठा संस्कृतीचा अनोखा संगम म्हणजे तंजावरचे…

17 hours ago

दुर्गांच्या प्रदक्षिणेतून उलगडणार सह्याद्रीचे इतिहासवैभव; भटकंतीचा अनोखा शब्दानुभव!

महाराष्ट्रातील ट्रेकिंगवरील पहिला दिवाळी अंक; २५ दर्जेदार लेखांनी सजलेला ‘दुर्गांच्या देशातून…’चा प्रदक्षिणा विशेषांक सह्याद्रीच्या डोंगररांगा,…

1 day ago

रामलीला मैदानावर इंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन; एकजूट टिकणार किती काळ?

रामलीला मैदानावर विरोधकांनी पुन्हा एकदा एकजुटीचे शक्तिप्रदर्शन केले. ‘व्होट चोरी’ आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…

1 day ago

बार्शीत २० वे महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलन

फुलचंद नागटिळक संमेलनाध्यक्ष तर डॉ. बी. वाय. यादव स्वागताध्यक्ष बार्शी - अखिल भारतीय मराठी साहित्य…

2 days ago