September 8, 2024
Medicinal use of Neem Tree Azadirachta indica
Home » कडूलिंबातील औषधी गुण…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कडूलिंबातील औषधी गुण…

कडूलिंबाचा ( Azadirachta indica ) प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे खूप कडू असतं. पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे.

◼️त्वचा व केसांची काळजी घेत रक्त शुद्ध करण्याचं काम कडूलिंब करतं. यासाठी कडूलिंबाच्या पानाचा काढा बनवून प्यावा.
◼️जर हातापायाला खूप घाम येत असेल तर कडूलिंबाचं तेल उपयुक्त आहे.
◼️चेहऱ्यावर मुरुम झाल्यास ही कडूलिंबाचं तेल उत्तम ठरतं. चेहऱ्यावर जुने डाग व उष्णतेनं पडलेले डाग जाण्यासाठी निंबोणीचं तेल लावावं.
◼️फोडं झाल्यास कडूलिंबाची साल घासून लेप लावा.
◼️जर केसांमध्ये उवा झाल्या असतील तर कडूलिंबाचं तेल लावा.
◼️टक्कल पडलं असेल तर कडूलिंबाचं तेल लावा.
◼️केस पिकत असतील तर कडूलिंब, बोराची पानं उकळून त्या पाण्यानं केस धुवा. कमीत कमी एका महिन्यात फरक जाणवले.
◼️कुष्ठरोगावर कडूलिंब वरदान ठरलंय. या रोगावर कडूलिंबानं उपचार होऊ शकतात.
◼️ताप आल्यास, टायफाईड झाल्यास कडूलिंबाची २०-२५ पानं, २०-२५ काळी मिरे एका गठ्ठ्यात बांधून अर्धा लिटर पाण्यात उकळून घ्या. पाणी उकळू द्या व झाकण लावून ठेवा. पाणी थंड झाल्यावर ४ भाग बनवून सकाळ-संध्याकाळ दोन दिवसांपर्यंत प्यावं.
◼️कडूलिंबाची पानं बारीक करून दही+मुल्तानी मातीमध्ये मिसळून पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील डाग काही दिवसांतच नाहीसे होतात.
◼️उन्हाळ्यात कडूलिंबाचा वापर त्वचेवरील मुरूम बरे करण्यास होतो.
◼️जर कुणा रुग्णाला लघवी होत नसेल तर कडूलिंबाची पानं बारीक करून पेस्ट पोटावर लावा, बरं वाटेल.
◼️दातांच्या आरोग्यासाठी कडूलिंब उपयुक्त आहे. बबूल काड्या, कडूलिंब दात स्वच्छ करायला वापरतात. शक्य असेल तर घरीच मंजन बनवून घ्या. यात जळलेली सुपारी, जळलेल्या बदामचे साल, १०० ग्रॅम खडू, २० ग्रॅम बेहडा, थोडी मिरे पूड, ५ ग्रॅम लवंग, अर्धा ग्रॅम पेपरमिंट बारीक करून मंजन तयार करा. या मंजनच्या वापरानं दातांच्या सर्व समस्या दूर होतात.
◼️पोटाच्या समस्या असतील, पोट साफ होत नसेल तर निंबोणी खा, पोट साफ होईल. रक्त स्वच्छ होईल आणि भूकही चांगली लागेल.
◼️शिळं अन्न खाण्यानं उलट्या पित्त वाढतं यासाठी कडूलिंबची साल, सूंठ, मिरेपूड ८-१० ग्रॅम सकाळी-संध्या पाण्यासोबत घ्या. ३-४ दिवसांत पोट साफ होईल. जर हागवण लागली असेल तर कडूलिंबाचा काढा प्या.
◼️कान दुखत असेल, कानात पू येत असेल तर कडूलिंबाचं तेल मधात मिसळून साफ करा, पू येणं बंद होईल.
◼️सर्दी-खोकला झाला असेल तर कडूलिंबाची पानं मधात मिसळून चाटण घ्या, गळ्यातील खवखव बरी होते.
◼️हृदयरोगात कडूलिंब राम- बाण ठरतो.जर हृदयरोगाची भीती असेल तर कडूलिंबाची पानांच्या ऐवजी कडूलिंबाच्या तेलाचं सेवन करा.
◼️डोळ्यांची जळजळ होत असेल/मोतीबिंदूचा त्रास होत असेल तर कडूलिंबाचं तेल डोळ्यात अंजनासारखं घाला.
◼️डोळे सूजले असतील तर कडूलिंबाची पानं बारीक करून डावा डोळा सूजला असेल तर उजव्या पायाच्या अंगठ्याला लेप लावा. डोळ्यांची सूज उतरेल व लाल झालेले डोळेही बरे होतील.
◼️कानात किडा गेला असेल तर कडूलिंबाच्या पानांचा रस कोमट करून चिमुटभर मीठ टाकून कानात थेंब टाका. एकाच प्रयत्नात किडा मरेल.
◼️पोटात जंत (किडे) झाले असतील तर पानांच्या रसात मध मिसळून चाटण घ्या कीडे मरतील.
◼️पाण्यात कडूलिंबाच्या तेलाची काही थेंब टाकून चहा सारखं प्या. लहान मुलाला ५ थेंब व मोठ्यांना ८ थेंबाहून अधिक घ्यावे.
◼️कडूलिंबाच्या पानात थोडं हिंग मिसळून चाटण घ्या, पोटातील किडे नष्ट होतात.
◼️कडूलिंबचे तेल फॅटी अ‍ॅसिड व त्वचेत सहजपणे शोषून घेतलं जातं. त्यात व्हिटॅमिन ई असतं, ते त्वचेच्या पेशींमधील लवचिकता कायम ठेवतात.

डॉ. मानसी पाटील


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मनुष्य अन् त्याचे पाळीव प्राणी यांच्यातील बंधांचा शोध घेणारा चित्रपट सीएते पेरोस (सेव्हन डॉग्स)

व्यवस्था परिवर्तनाचा कृतिशील विचार सांगणारी कविता

प्रामाणिक, निडर पोलिस अधिकारी महिलेची विलक्षण जीवनकहाणी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading