कोल्हापूर – भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाच्या श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, राज्यशास्त्र विभाग, गाधी अभ्यास केंद्र आणि नेहरू अभ्यास केंद्र याच्यावतीने २५ जानेवारी २०२४ रोजी पोस्टर स्पर्धेचे आयोजन केले आहे. भारतीय गणराज्य आणि स्त्रियांचा राजकीय सहभाग या विषयावर ही स्पर्धा होत असून सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे, अशी माहिती अध्यासनाच्यावतीने प्रा. डॉ. भारती पाटील यांनी दिली आहे.
भारतीय स्त्रियांचे मतदार वर्तन, लोकसभेतील / राज्यसभेतील स्त्रिया, राज्यविधान मंडळातील स्त्रियांचा सहभाग, राज्यविधान मंडळ आणि लोकसभा यामधील स्त्रियाचे आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थामधील स्त्रियांचा सहभाग, भारतातील स्त्रियांचे नेतृत्व, भारतीय स्त्री नेतृत्वापुढील आव्हाने, ग्रामसभा व स्त्रियांचा सहभाग, महिला ग्रामपंचायती, स्त्रियांचे नेतृत्व आणि स्त्री सबलीकरण, तृतिय पंथियांचा राजकारणातील सहभाग असे या पोस्टर स्पर्धेचे विषय आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमाकास ३००० रुपये, व्दितीय क्रमांकास २००० रुपये, तृतीय क्रमांकास १००० रुपये, उत्तेजनार्थ ७०० रुपये अशी बक्षीसे देण्याचे निश्चित केले आहे.
स्पर्धेत मराठी, इंग्रजी, हिंदी असे कोणत्याही भाषेत पोस्टर सादर करता येऊ शकणार आहे. त्याचा आकार २८ बाय २२ इंच इतका असावा. पोस्टर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रती व्यक्ती पन्नास रुपये नोदणी शुल्क असून नोंदणीची अतिम मुदत १६ जानेवारी २०२४ अशी आहे. पोस्टर २५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता शिवाजी विद्यापीठाच्या श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनामध्ये जमा करण्यात यावे तसेच आयोजित चर्चासत्रामध्ये सहभागी व्हावे. चर्चासत्रानंतर ४ वाजता पोस्टर विजेत्यांचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम होईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.