संज्याच्या निर्मळ प्रेमाची खिल्ली उडविणाऱ्या या दुनियेनं संज्याला अशा फेऱ्यात अडकवलं की संज्यानं हिजडा होणंच पसंद केलं. पण, पुढे काय?
आयुष्यात प्रत्येकानेच कधी ना कधी प्रेम केलेलं असतं. कधी तिचं नाव कागदावर लिहून त्या कागदाची पप्पी घेतलेली असते, तर कधी स्लोमोशनमध्ये धावत जाऊन तिला कडेवरही घेतलेलं असतं. प्रत्येकाने स्वत:मध्ये एका हिरोला शोधलेलं असतं. कधी तुम्ही शाहरुख असता आणि ती काजोल, तर कधी तुम्ही गोविंदा आणि ती करिष्मा. स्वप्नातही तिच असते, रानातही डोळे तिलाच शोधत असतात आणि गावभर फिरता तुम्ही जाता फक्त तिच्यासाठीच.
सोंग कादंबरीतल्या संज्यानेही असंच बेभान प्रेम केलं होतं. तो हसायचा फक्त तिच्यासाठी. झोपेतून उठायचा फक्त तिच्यासाठी आणि शाळेतही जायचा तिच्यासाठी. याच संज्याने साडी नेसायचं ठरवलं तेही फक्त तिच्यासाठी.
तिने आपल्याकडं पहावं म्हणून. तिने आपल्याकडं पाहून हसावं म्हणून आणि आपल्यालाही तिच्याकडं पाहता यावं म्हणून संज्यासारख्या धडधाकट पोरानं साडी नेसली खरी, पण ती साडी कायमचीच त्याच्या अंगाला चिकटून राहील, असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
संज्याच्या निर्मळ प्रेमाची खिल्ली उडविणाऱ्या या दुनियेनं संज्याला अशा फेऱ्यात अडकवलं की संज्यानं हिजडा होणंच पसंद केलं. पण, पुढे काय? संज्या आयुष्यभर तसाच राहतो का ? त्याचं प्रेम पूर्ण होतं का ? आपल्यावर जो मुलगा प्रेम करतो त्याला आयुष्यभर साडीत बघणं कोणती मुलगी स्वीकारेल ? अशा हजारो टणक प्रश्नांची तेवढीच खणखणीत उत्तरे म्हणजेच सोंग आणि पुढचं सोंग या कादंबऱ्या.
पुस्तकाचे नाव – सोंग
लेखक – नितीन अरूण थोरात
प्रकाशक – रायटर प्रकाशन
किंमत – ३०० रूपये
पाने २२४
कादंबरी मागविण्यासाठी संपर्क – 8180010307
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.