दिवाळी आणि दिवाळी अंक यांचा संबंध वर्षानुवर्षे चालत आलाय, नव्हे ही परंपराच झाली आहे. चोखंदळ वाचक अगदी चातकासारखे दिवाळी अंकांची प्रतीक्षा करीत असतात. मात्र हल्लीच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, डोळ्यांच्या आजारामुळे किंवा वृद्धापकाळाने इच्छा असूनही काही वाचक दिवाळी अंक वाचू शकत नाहीत. हीच महत्वाची बाब लक्षात घेऊन रेणुका आर्टस्’ने पाच वर्षांपूर्वी प्रयोग म्हणून स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक काढला. दृक्श्राव्य अर्थात ऑडियो- व्हिज्युअल. हा दिवाळी अंक केवळ साहित्यिकांपुरताच मर्यादित न ठेवता कलाकार व गायकांना देखील दिवाळी अंकात स्थान मिळाल्याने अंक अल्प कालावधीतच अत्यंत लोकप्रिय झाला.
स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक, २०२४ मध्ये प्रतिष्ठित तसेच नवोदित साहित्यिकांच्या कथा, ललित लेख, कवितांसोबत हौशी कलाकारांची कला तसेच गायन समाविष्ट आहे. कथा, ललित लेख व कविता आपण प्रत्यक्ष लेखक व कवींच्या आवाजात ऐकू शकता. यंदा कथाबीजावरून कथा गुंफणे, ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’, या विषयावर उत्कंठावर्धक ललित लेख लिहिणे व चित्रकाव्यसारखे दिलेले आव्हानात्मक विषय लेखक व कवींनी लीलया पेलले आहेत.
‘स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंकातील’ साहित्य व कलेचे व्हिडियोज युट्युबवर उपलब्ध असल्याने या अंकाचा आपण आपल्या सोयीनुसार केव्हाही, कुठेही आस्वाद घेऊ शकतो, अगदी प्रवासात देखील..! थोडक्यात, हा दिवाळी अंक चालता बोलता मनोरंजन आहे. त्यामुळेच मराठी साहित्य क्षेत्रात दमदार पाऊल टाकणाऱ्या या आगळ्यावेगळ्या अंकाला वाचनप्रेमी व रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. आसावरी इंगळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अंकाचे मुखपृष्ठ, मांडणी व संपादन देखील त्यांनीच केले आहे.
प्रत्येकाच्या फोन, लॅपटॉप, पीसीच्या सेटिंगनुसार दिवाळी अंक उघडण्याकरीता दोन लिंक्स दिल्या आहेत.
फ्लिपबुक लिंक – https://heyzine.com/flip-book/c9ca9b24b8.html
pdf लिंक – https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:4a24bc50-b722-457d-ad45-aab5f7f2df28
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.