महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी पदवीधर रोजगार मेळाव्याचे आयोजन
राहुरी – येथील महात्मा फुले विद्यापीठात २० ते २२ डिसेंबर, २०२२ दरम्यान कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांचे संकल्पनेतून आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठातील नाहेप- कास्ट प्रकल्प व माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नातून एमपीकेव्ही क्लायमेक्स – २०२२ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात कृषी उद्योजकांचे व इतर उद्योजकांचे भव्य प्रदर्शन, कृषी पदविधरांचा भव्य मेळावा, कृषी पदवीधरांसाठी रोजगार मेळावा, यशस्वी कृषी उद्योजकांची व्याख्याने, शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रे व इतर उपक्रमांचे आयोजन केले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये यशस्वी कृषी पदवीधर उद्योजक यांचे मार्गदर्शन होणार आहे. आत्तापर्यंत रोजगार मेळाव्यासाठी १००० कृषी पदवीधरांनी व ३० कंपन्यांनी नाव नोंदणी केल्यामुळे बऱ्याच तरुण कृषी पदवीधरांना या क्लायमेक्समध्ये कृषी क्षेत्रातील नोकरीच्या संधी तेथेच निश्चित करता येणार आहे. एमपीकेव्ही क्लायमेक्स – २०२२ या कार्यक्रमात कृषी पदवीधर उद्योजक, इतर उद्योजक, सरकारी, निमसरकारी, खाजगी संस्था व शेतकरी उद्योजक यांचे या प्रदर्शनात स्टॉल राहणार आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.