February 6, 2023
MPKV Climex Event in Rahuri
Home » महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी पदवीधर रोजगार मेळाव्याचे आयोजन
करिअर अन् स्पर्धा परिक्षा काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी पदवीधर रोजगार मेळाव्याचे आयोजन

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी पदवीधर रोजगार मेळाव्याचे आयोजन

राहुरी – येथील महात्मा फुले विद्यापीठात २० ते २२ डिसेंबर, २०२२ दरम्यान कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांचे संकल्पनेतून आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठातील नाहेप- कास्ट प्रकल्प व माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नातून एमपीकेव्ही क्लायमेक्स – २०२२ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमात कृषी उद्योजकांचे व इतर उद्योजकांचे भव्य प्रदर्शन, कृषी पदविधरांचा भव्य मेळावा, कृषी पदवीधरांसाठी रोजगार मेळावा, यशस्वी कृषी उद्योजकांची व्याख्याने, शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रे व इतर उपक्रमांचे आयोजन केले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये यशस्वी कृषी पदवीधर उद्योजक यांचे मार्गदर्शन होणार आहे. आत्तापर्यंत रोजगार मेळाव्यासाठी १००० कृषी पदवीधरांनी व ३० कंपन्यांनी नाव नोंदणी केल्यामुळे बऱ्याच तरुण कृषी पदवीधरांना या क्लायमेक्समध्ये कृषी क्षेत्रातील नोकरीच्या संधी तेथेच निश्चित करता येणार आहे. एमपीकेव्ही क्लायमेक्स – २०२२ या कार्यक्रमात कृषी पदवीधर उद्योजक, इतर उद्योजक, सरकारी, निमसरकारी, खाजगी संस्था व शेतकरी उद्योजक यांचे या प्रदर्शनात स्टॉल राहणार आहेत.

Related posts

मराठेशाहीचा वारसा लाभलेला पुरंधरचा लोकशाहीतला वीर!

वसंत पाटणकर यांना समीक्षा पुरस्कार

मुलांच्या आयुष्यात आनंद पेरणारी प्राजक्ता

Leave a Comment