Shivaji University Modi Script Certificate Course Admission Process Begins
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र आणि इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या मार्फत ६ महिने कालावधीच्या ‘मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रमा’साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना २८ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येईल. या अभ्यासक्रमासाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवी आवश्यक आहे.
शिवपूर्वकाळापासून ते स्वातंत्र्यकाळापर्यंत प्रशासनाची तसेच दैनंदिन कामकाजासाठी मराठी भाषे बरोबरच मोडी लिपीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. त्यामुळे या कालखंडातील इतिहास समजून घेण्यासाठी, संशोधनासाठी आणि प्रशासकीय दस्तऐवज उलगडण्यासाठी मोडी लिपीचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे.
सध्याच्या काळात सामाजिक शास्त्रांच्या विद्यार्थ्यांपुढे रोजगाराची समस्या असताना, मोडी लिपीसारखे कौशल्य रोजगाराचे नवे मार्ग खुले करू शकते. १९६० पूर्वीच्या शेतीविषयक नोंदी, जन्म-मृत्यूच्या नोंदी, खरेदीखते आणि जुने न्यायालयीन दावे यांसारखी सर्व महत्त्वाची कागदपत्रे मोडी लिपीतच उपलब्ध आहेत. या कागदपत्रांचे लिप्यांतर करून देण्याचे काम करून व्यावसायिकदृष्ट्या उपजीविकेचे साधन निर्माण करता येते.
इतिहास काळातील कोणत्याही विषयावर संशोधन करायचे असेल तर मोडी लिपी अवगत असणे अत्यंत गरजेचे आहे. या अभ्यासक्रमाचा संशोधक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राच्या समन्वयक डॉ. नीलांबरी जगताप यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी (०२३१) २६०९४६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
शिवाजी विद्यापीठात जलसंवर्धन आणि अहिंसक विकासावर विशेष व्याख्यान; पर्यावरण संवर्धनासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन कोल्हापूर :…
अनेक ग्रंथ वाचूनही मन अस्थिर राहू शकते आणि थोडासा संतविचार मनात खोलवर रुजल्यास जीवनाकडे पाहण्याची…
नदीचा विचार केला तर तिचे पाणी नदीचे स्वतःचे नसते. पर्वतांतील झरे, पाऊस आणि असंख्य जलस्रोत…
जुनी पेन्शन योजना लागू करण्याची सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि प्राध्यापकांची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत असताना,…
अॅग्रीव्होल्टाइक्स तंत्रज्ञानातून एकाच जमिनीवर पीक उत्पादन आणि सौरवीज निर्मिती शक्य; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच हवामानातील अनिश्चिततेचा…
सोयाबीन, दुग्धव्यवसाय, कापूस आणि फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती; २३ ऑक्टोबरच्या दिल्लीतील मोर्चात…