📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 11, 2026
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

शिवाजी विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू Shivaji University Modi Script Certificate Course Admission Process Begins

शिवाजी विद्यापीठात सहा महिन्यांच्या मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पदवीधरांना २८ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार असून मोडी दस्तऐवज वाचनाचे कौशल्य मिळणार आहे.

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र आणि इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या मार्फत ६ महिने कालावधीच्या ‘मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रमा’साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना २८ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येईल. या अभ्यासक्रमासाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवी आवश्यक आहे.

शिवपूर्वकाळापासून ते स्वातंत्र्यकाळापर्यंत प्रशासनाची तसेच दैनंदिन कामकाजासाठी मराठी भाषे बरोबरच मोडी लिपीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. त्यामुळे या कालखंडातील इतिहास समजून घेण्यासाठी, संशोधनासाठी आणि प्रशासकीय दस्तऐवज उलगडण्यासाठी मोडी लिपीचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे.

सध्याच्या काळात सामाजिक शास्त्रांच्या विद्यार्थ्यांपुढे रोजगाराची समस्या असताना, मोडी लिपीसारखे कौशल्य रोजगाराचे नवे मार्ग खुले करू शकते. १९६० पूर्वीच्या शेतीविषयक नोंदी, जन्म-मृत्यूच्या नोंदी, खरेदीखते आणि जुने न्यायालयीन दावे यांसारखी सर्व महत्त्वाची कागदपत्रे मोडी लिपीतच उपलब्ध आहेत. या कागदपत्रांचे लिप्यांतर करून देण्याचे काम करून व्यावसायिकदृष्ट्या उपजीविकेचे साधन निर्माण करता येते.

इतिहास काळातील कोणत्याही विषयावर संशोधन करायचे असेल तर मोडी लिपी अवगत असणे अत्यंत गरजेचे आहे. या अभ्यासक्रमाचा संशोधक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राच्या समन्वयक डॉ. नीलांबरी जगताप यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी (०२३१) २६०९४६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related posts

‘मुक्त’ विद्यापीठाची वाटचाल खासगीकरणाकडे ? Open University moving towards privatization

संत तुकारामांच्या अभंगात अध्ययनाच्यादृष्टीने मार्गदर्शक तत्त्वप्रणाली

‘मिसाईल मॅन’ डॉ. कलाम यांच्या सोबतचा अविस्मरणीय संवाद; आयुष्याला मिळाली नवी दिशा Unforgettable conversation with Missile man Dr Apj Abdul Kalam

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
Skip to toolbar