खजूर
इंग्रजी नाव – Date palm
शास्त्रीय नाव – Phoenix dactylifera
अरबस्तानात मूळ असलेले हे फळ अतिशय बलवर्धक आहे. अशक्त मुलांना रोज खजूर दिल्यास त्यांची तब्बेत गुटगुटीत होते. आजारातून बरे झाल्यानंतर खजूर खाल्ल्यास अशक्तपणा कमी होतो. भूक लागण्यासाठी खजूर चिंचेची चटणी उपयोगी पडते.
खजूर मध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि सी विपुल प्रमाणत असते. तसेच लोह, कॅल्शियम, तांबे आणि फॉस्फरस आहे. पचनसंस्था मजबूत करण्याचे काम खजूर करते. प्रतिकारशक्ती चांगली होते. पित्त कमी करायला खजूर मदत करतो.
खजूर हा उपवासाला खाल्ल्यास चांगला. रोज दोन तरी खजूर नक्की खा.
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक , ताराबाई पार्क,
सासने ग्राउंड जवळ
कोल्हापूर
9623895866
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.