कोल्हापूरः येथील स्वयंसिद्धाच्या प्रेरणेने साकारलेली स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित यांच्यावतीने कै. सौ. सरोजिनीदेवी विश्वनाथ पाटील तथा काकीजी यांच्या ५४ व्या स्मृतिदिनानिमित्त महिलांसाठी वत्त्कृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये वीस वर्षावरील शेतकरी महिलांसाठी जिल्हास्तरीय सरोज चषक वत्कृत्व स्पर्धा आयोजन केली आहे, अशी माहिती संस्थेच्यावतीने कांचनताई परुळेकर यांनी दिली आहे.
वत्त्कृत्व स्पर्धा २०२३ साठी शेतीत महिलांचे योगदान, शेतकरी नवरा हवा की नको ?, सेंद्रिय शेतीची गरज, तृणधान्य / भरडधान्य शेतीची आवश्यकता हे विषय आहेत. विजेत्यांना पारितोषिक व रोख रक्कम देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकास सरोज चषक आणि २५०० रूपये, द्वितीय क्रमांकास चषक आणि २००० रूपये, तृतीय क्रमांकास चषक आणि १५०० रूपये असे पारितोषिकाचे स्वरुप आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ५० रुपये असून १० जुलै २०२३ पर्यंत नाव नोंदणी करावी. ही स्पर्धा १८ जुलै २०२३ रोजी सकाळी दहा वाजता स्वयंसिद्धा कार्यालयात होणार आहे. अधिक माहितीसाठी ९३२६६००८५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.