ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एंटरटेन्मेंटतर्फे आयोजित ‘साहित्यवलय पुरस्कार २०२५’ची घोषणा करण्यात आली आहे. विविध साहित्यप्रकारांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लेखकांना यावर्षी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी दिली.
या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान पद्मश्री पद्मजा फेणाणी- जोगळेकर भूषविणार आहेत. हा सोहळा १० ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी साडे दहा वाजता ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे पार पडणार आहे.
विविध साहित्य प्रकारातील पुरस्कारार्थी असे :
पदार्पण – ‘सारंगीचे सूर’ – दीपक मच्याडो (बोरीवली)
सर्वोत्कृष्ट कादंबरी – सवाष्ण’ – डॉ क्षमा गोवर्धने शेलार (जुन्नर)
सर्वोत्कृष्ट स्त्रीवादी साहित्य- ‘बाय गं’ – विद्या पोळ जगताप (सातारा)
सर्वोत्कृष्ट कथासंग्रह – ‘ वर्जीतमध्य’ – सुरेंद्र दरेकर (पुणे)
सर्वोत्कृष्ट ललित संग्रह – ‘ सरतं काही सोडू नये’ – सुनील यावलीकर (अमरावती)
सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्य – ‘देवाची स्वाक्षरी’ – ए आर नायर आणि जे ए थेरगावकर (कल्याण डोंबिवली)
सर्वोत्कृष्ट वृत्तबद्ध काव्यसंग्रह – ‘ रंध्रात भीनावा छंद’ – कांचन सावंत (तळेगाव)
सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह – ‘ जामिनावर सुटलेला काळा घोडा’ – धनाजी धोंडीराम घोरपडे (सांगली)
सर्वोत्कृष्ट गजल संग्रह – ‘निव्वळ योगायोग’ – प्राजक्ता पटवर्धन (पुणे)
सर्वोत्कृष्ट बालसाहित्य – ‘थेंबा थेंबाची कहाणी’ – गणेश शिवराम भाकरे (नागपूर)
सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक साहित्य – ‘ पाकिस्तान का मतलब क्या’ – श्रीधर लोणी (पुणे)
लक्षवेधी साहित्य पुरस्कार असे –
‘जपलाला कनवटीचा’ – कल्पना बांदेकर (सावंतवाडी)
‘निलू निरंजना – गोष्ट हिची पृथ्वी मोलाची’ – मृणालिनी चितळे (पुणे)
‘माती मागतेय पेनकिलर’ – सागर जाधव जोपुळकर (नाशिक)
‘ भाकीत’ – आदित्य अंकुश संतोषी (ठाणे)
‘एकलव्य आणि अर्जुन’ – डॉ सुमन नवलकर (वडाळा)
‘द लास्ट बॅलन्स’ – रामदास खरे (ठाणे)
‘प्रतिभासूर्य रवींद्रनाथ टागोर’- प्रदीप कुलकर्णी (मुलुंड)
‘साहित्यवलय’ पुरस्काराचे स्वरुप ५ हजार ५५५ रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे. तर लक्षवेधी साहित्यासाठी १ हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती पाचंगे यांनी दिली.
सोहळ्याचा पूर्वार्धात पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचे गायन आणि त्यांचा शिष्य व धृपद एंटरटेनमेंट चे संचालक कवी, संगीतकार ऋग्वेद देशपांडे हे त्यांच्याशी साहित्यिक संवाद साधतील. संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन धृपद एंटरटेनमेंटच्या सहसंचालिका मानसशास्त्रज्ञ पूजा देशपांडे करतील.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
