July 22, 2025
Cover of ‘Suryabhan’ poetry book by Dr. Praful Amberkar with event stage setup in background
Home » कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या ‘ सूर्यभान ‘ काव्यसंग्रहाचे ८ रोजी प्रकाशन
काय चाललयं अवतीभवती

कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या ‘ सूर्यभान ‘ काव्यसंग्रहाचे ८ रोजी प्रकाशन

ॲड. देवदत्त परुळेकर, प्रा.संजीवनी पाटील, प्रसाद घाणेकर, डॉ.मिलिंद कुलकर्णी यांची उपस्थिती

कणकवली- कणकवलीतील त्वचारोग तज्ञ तथा कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या सूर्यभान या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार ८ जून रोजी सायं. ४.३० वा. कसाल कोलते हॉस्पिटलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

प्रभा प्रकाशन आणि डॉ प्रफुल्ल आंबेरकर परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ॲड. देवदत्त परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ असून प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी साहित्याच्या अभ्यास प्रा.संजीवनी पाटील, रसिक अग्रणी वाचक प्रसाद घाणेकर आणि महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांचा सूर्यभान हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होत असून या संग्रहाला प्रसिद्ध कवी अजय कांडर यांची अभ्यासपूर्ण पाठराखण लाभली आहे.त्यात ते म्हणतात, कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या ‘सूर्यभान ‘ काव्यसंग्रहातील कविता समंजसपणाचा स्वर अधिक ठळक करत जाते. ‘ दुःखालाही गाळून पिता येतं हे माहीत असावं’.असं सूचन करणाऱ्या या कवितेत समतेचे ममत्व गाण्याची इच्छा व्यक्त होते. देशभूमी सुजलाम् सुफलाम् होण्याची स्वप्ने दाखविणारा नवा महापुरुष जन्माला यावा अशीही आस या कवितेत आहे. संविधानकर्त्याचे स्मरण करुन एकात्मता वाढीस लागेल अशीही अभिलाषा बाळगली जात आहे.

या सगळ्या मागे कवीची असलेली मानवी मूल्यांवरची अढळ श्रद्धा महत्वाची आहे. जात, धर्माच्या पलीकडे फक्त माणूसच श्रेष्ठ आणि त्याचं नैसर्गिक जगणं हेही या कवितेच्या केंद्रस्थानी येतं. त्यामुळेच ‘सूर्यभान’ च्या कोणत्याही काव्यपंक्तीमध्ये भेदाला स्थान नाही. आजच्या शतखंडित काळात जे.सी.बी. सारखं महत्वाकांक्षेने सगळंच चिरडलं जातंय तरी फिनिक्सच्या राखेतूनही जिद्दीने उभं राहायचं असतं, असा संदेशही ही कविता देताना सकारात्मकतेची ऊर्जाही ती देते. तर दुसऱ्या बाजूला माणसे कोलमडून जातात याचा आत्मशोध ही कविता घेत असल्यामुळे माणसाच्या स्वाभिमानाला तिच्या ठायी अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज कोकणात लिहिल्या जाणाऱ्या एकूण कवितेत या कवितेची वाट स्वतंत्र आहे. तरी रसिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – 86987 30928


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading