September 27, 2023
Maay Marathi Poem by Sunetra Joshi
Home » माझी माय मराठी..
मुक्त संवाद

माझी माय मराठी..

माझी माय मराठी..

माझी माय मराठी
तिचे मी लेकरु.
आईविना जगू कसे
तिला कसे मी विसरू?.

तिच्या अंगाखांद्यावर
बागडलो बालपणी.
तिच्या कुशीत झोपलो
ऐकुन अंगाईगाणी.

माझी माय मराठी तिचा
स्वर गोड लडिवाळ.
तिचा पदर धरुनच
मोठा होतो तिचा बाळ.

माझ्या माय मराठीचे
थोर उपकार माझ्यावर.
जगी नाव कमावण्या
कामी आले तिचे संस्कार.

माझ्या माय मराठीचा
मला वाटे अभिमान.
तिची थोरवी गाऊन
व्हावा जगात सन्मान.

बाकीच्या सार्‍या भाषा
तिच्या भगिनीसमान.
परी माय ती माय असे
माझी मराठी महान.

सौ सुनेत्रा विजय जोशी
रत्नागिरी

Related posts

राणी लक्ष्मीबाईची ज्वलजहाल कहाणी

नवीन वर्ष…

पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस

Leave a Comment