August 20, 2025
ओव्याची पाने (Ajwain Leaves) पचन, खोकला, वजन कमी, सांधेदुखी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त. आजीच्या भाजी रानभाजी मालिकेत या औषधी रानभाजीची माहिती जाणून घ्या.
Home » आजीची भाजी रानभाजी – ओवा
फोटो फिचर वेब स्टोरी शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आजीची भाजी रानभाजी – ओवा


पोटदुखीवर खावा पानांचा ओवा

‘आजी आणि तिची रानभाजी’ ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे पानांचा ओवा..

प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते

शास्त्रीय नाव: Trachyspermum copticum, ट्रॅकिस्पर्मम कॉप्टिकम

आदिवासी जमातीत दैनंदिन आहारात रानभाज्यांचा उपयोग करीत असतात. ऋतूमानानुसार या रानभाज्या त्यांना सहज उपलब्ध होत असतात. त्यामुळे रानभाज्यांची संपूर्ण माहिती त्यांना असते. या पारंपरिक अन्नाविषयीचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत त्यांच्यामधून सहजरित्या पोहोचते. काही विशिष्ट सणादिवशी काही वनस्पतींचा वापर ते आहारात आर्वजून करतात. यामधून त्यांची निसर्गाशी जुळलेली नाळ गडद होत जाते. भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून, तर उकळून, भाजून, वरण, भाजी आदी खाद्यपदार्थ तयार केले जातात. सुमारे चौदा वनस्पती या मधुमेह, पोटदुखी, खोकला आदींवर औषधी म्हणून तर काही वनस्पती गर्भवती आणि बालकांसाठी अतिशय उपयुक्त ठरल्या आहेत.

पानांचा ओवा याबद्दल माहिती घेवू. या वनस्पतीच्या पानांचा ओव्यासारखा वास येतो. या वासावरुन या रानभाजीचे नाव पानांचा ओवा असे पडले आहे. या वनस्पतीची लागवड बागेत केली जाते. पिण्याच्या पाण्याला सुवासिक वास येण्यासाठी तसेच औषधामध्ये हिच्या पानांचा वापर केला जातो. मानवी जीवनाप्रमाणे गुरांसाठी औषध म्हणून देखील वापरतात. पोटदुखी, अपचन, पोटशूळ यामध्ये एखादे पान दिल्यास गुणकारी ठरते. दमा, जुनाट खोकला यामध्ये देखील पानांचा ओवा प्रभावी ठरतो.

एका पातेल्यात या वनस्पतीच्या खुडलेली पाने पेलाभर पाण्यात उकळून घ्यावीत. त्यानंतर त्यामधील पाणी निथळू द्यावे. कढईत फोडणीसाठी तेल गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण, जिरे, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो तळून घ्यावेत. नंतर त्यामध्ये भाजी टाकून शिजू द्यावी. कोथिंबीर टाकून भाजी खाण्यास तयार. हिच्या पानांपासून भजीदेखील उत्तमरित्या बनवता येतात.

ओव्याची पाने (Ajwain or Carom leaves) आरोग्यासाठी खूप गुणकारी आहेत. ओव्याच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने, त्यांचा उपयोग विविध आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

ओव्याच्या पानांचे फायदे:
पचन सुधारते:
ओव्याची पाने पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे, अपचन, गॅस आणि पोटदुखीसारख्या समस्या कमी होतात.

सर्दी-खोकल्यासाठी फायदेशीर:
ओव्याच्या पानांचा रस किंवा काढा सर्दी, खोकला आणि कफ झाल्यास आराम देतो.

वजन कमी करण्यास मदत करते:
ओव्याच्या पानांचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते, कारण ते चयापचय क्रिया सुधारते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते:
ओव्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ते उपयुक्त आहेत.

सांधेदुखीवर आराम:
ओव्याच्या पानांचा लेप सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी उपयोगी आहे.

त्वचेसाठी फायदेशीर:
ओव्याच्या पानांचा त्वचेवर उपयोग केल्यास खाज, पुरळ आणि त्वचेच्या ऍलर्जीमध्ये आराम मिळतो.

ओव्याच्या पानांचा उपयोग कसा करावा:

चहा:
ओव्याची पाने पाण्यात उकळवून चहाप्रमाणे प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.

भजी:
ओव्याच्या पानांची भजी (fritters) बनवून खाल्ली जातात, जी एक रुचकर आणि आरोग्यदायी पदार्थ आहे.

रस:
ओव्याची पाने वाटून त्याचा रस काढला जातो आणि तो विविध आरोग्य समस्यांसाठी वापरला जातो.

लेप:
ओव्याची पाने वाटून त्याचा लेप त्वचेवर किंवा सांध्यांवर लावला जातो.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading