अनाथांची जात
"जात "कोरायची राहून गेली
जन्मदाखल्यावर माझ्या
अनेक पडले रक्त थारोळे
थेंब ना सांडला अंगावर माझ्या
आई रडली होती का
मला सोडून जाताना
कोणी सांगेल का मला
कोणत्या रंगाचा पान्हा होता
माझं जन्मस्थळ
कोणत्या गावचं
बापाची वंशावळ
कोणत्या तहसीला शोधायची
माझी जन्मआई
कोणत्या जातीची
कोणी सांगेल का मला
मी कोणत्या आईची
अनाथांच्या जातीत
जन्मले म्हणून वाचले
सगळ्यात हात उंच माझा
माणुसकीच्या जातीचा ....
कवयित्री - स्वाती ठुबे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.